ETV Bharat / city

Patra Chawl Scam : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार, प्रवीण राऊतांनी दिलेल्या पैशातून 10 भूखंड घेतले

author img

By

Published : Aug 3, 2022, 10:35 PM IST

Updated : Aug 3, 2022, 10:53 PM IST

संजय राऊतांच्या ( shivsena leader sanjay raut ) अडचणी वाढणार आहेत. कारण अलिबागमधील 10 भूखंड खरेदी करण्यासाठी संजय राऊतांनी विक्रेत्यांना 3 कोटी रुपये दिले आहेत. ती रक्कम प्रवीण राऊतांनी संजय राऊतांना दिली होती, असे ईडीने सांगितलं आहे.

sanjay raut
sanjay raut

मुंबई - कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ( Patra Chawl Scam ) शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात आता ईडीला चौकशी करताना महत्वाची माहिती हाती लागली आहे. संजय राऊत यांनी अलिबागमधील 10 भूखंड खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांना 3 कोटी रुपये दिले आहेत. प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊतांना ही रक्कम मिळाली होती, असेही ईडीने सांगितलं आहे.

गुरुवारी आणखी पुरावे सादर करणार - संजय राऊत यांना ईडीने रविवारी ( 1 ऑगस्ट ) सोळा तासाच्या मॅरेथॉन चौकशीनंतर मध्यरात्री अटक केली होती. सोमवारी ( 2 जुलै ) त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता, 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी संजय राऊत यांची कोठडी संपणार आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयात हजार करण्यात येणार असून, ईडी त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला गेल्या दोन दिवसांता तपासादरम्यान, मिळालेले पुरावे सुद्धा ईडी न्यायालयासमोर सादर करणार आहे, अशी माहितीही मिळाली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

  • Statement of former HDIL accountant also recorded today. Apart from money transferred to Raut's account, Raut had received large amount of cash from Praveen Raut. This is the money used in purchase of flats in Alibaug & Mumbai: ED

    — ANI (@ANI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रवीण राऊतांनी दिली रक्कम - पत्राचाळ घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर अलिबागमधील किहीम बीचवर असलेल्या या 10 भूखंडांच्या खरेदीसाठी संजय राऊत यांनी केला. त्यासाठी लागणारी रक्कम प्रवीण राऊत यांनी संजय राऊतांना दिली होती. संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक असून, या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहे, असे ईडीने स्पष्ट केलं आहे.

मंगळवारीही ईडीचे छापे - पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सुद्धा ईडीने मुंबईतील दोनठिकाणी छापे टाकले. या दोन परिसरांपैकी एकामध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानाचा समावेश आहे आणि दुसरा परिसर हा कंपनीचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expanasion : अखेर शिंदे सरकारला मिळाला मुहूर्त, 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

Last Updated :Aug 3, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.