ETV Bharat / city

शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...

author img

By

Published : Jul 10, 2022, 1:53 PM IST

शिवसेनेचे खरे आमदार ( Shiv Sena MLA ) कोण? शिंदे गटासोबत गेलेले आमदार, की उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासोबत राहिलेले आमदार ? यावरून तिढा निर्माण झाला असताना ही नोटीस बजावण्यात आली आहे. शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. आदित्य हे बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचे नातू असल्या कारणाने त्यांचा आदर करत त्यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले होते.

विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा
विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा

मुंबई - विधानसभेतील ( Assembly ) 16 आमदारांच्या ( MLA ) निलंबनाच्या नोटीसीवर उद्या 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार असताना त्याआधीच विधिमंडळ सचिवांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे खरे आमदार ( Shiv Sena MLA ) कोण? शिंदे गटासोबत गेलेले आमदार, की उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासोबत राहिलेले आमदार ? यावरून तिढा निर्माण झाला असताना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणी वेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ही नोटीस बजावून उत्तरासाठी त्यांना 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांचे नाव वगळले? - शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीसाठी व्हीप काढला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे. तसेच बहुमत चाचणी वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगितले होते. पण या आमदारांनी नार्वेकरांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांची तक्रार करण्यात आली. परंतु, यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. आदित्य हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्या कारणाने त्यांचा आदर करत त्यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले होते.

7 दिवसात बाजू मांडण्याचा अवधी ? - विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती? प्रतोद कोण? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तर विधानसभेच्या विशेष अधिवेश अधिवेशनात शिंदे गट व ठाकरे गट या दोघांनी एकमेकांविरोधामध्ये व्हीप काढले होते. आता दोन्ही बाजूंकडून व्हीव झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या दोन्ही तक्रारींची दखल विधिमंडळ सचिवांनी घेतली, असून त्यानुसार त्यांना पुढील 7 दिवसात बाजू मांडण्यास सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून प्रथम सुनील प्रभू यांनी व्हीप केला होता. शिंदे गटाकडून प्रथम भरत गोगावले यांनी व्हीप जारी केला होता. परंतु, दोन्ही बाजूने या व्हिपचं उल्लंघन झाल्याने आता यावर काय निर्णय होतो हे पाहणं गरजेचे आहे.

हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2022 : विटेवर साकारली विठ्ठलाची प्रतिमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.