Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'

author img

By

Published : Mar 5, 2022, 2:21 PM IST

Updated : Mar 5, 2022, 2:36 PM IST

Sanjay Raut On Phone Taping Case
संजय राऊत ()

महाराष्ट्रात फोन टॅपिंग ( Maharashtra Phone Taping Case ) प्रकरण गाजत असतानाच आता गोव्यात देखील महाराष्ट्र्राची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On Phone Taping Case ) यांनी केला आहे. गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? सवाल देखील ट्विटरवरून उपस्थित केला आहे. तसेच ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, गोव्यातही शांतता फोन टॅपिंग सुरु आहे असा प्रयोग सुरू आहे.

मुंबई - महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरण ( Shiv Sena Leader Sanjay Raut On Phone Taping ) गाजत असतानाच आता गोव्यात देखील महाराष्ट्र्राची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut On Phone Taping Case ) केला आहे. गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? सवाल देखील ट्विटरवरून उपस्थित केला आहे. राजकीय वर्तुळात यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण -

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. तत्कालीन गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख अधिकारी रश्मी शुक्ला यांनी 2017 आणि 2018 कालावधी दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर ज्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीच्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या. त्यामुळे शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याशी या प्रकरणाचा संबंध जोडण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत फडणवीस यांची चौकशीकरावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे शुक्ला यांच्या अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ -

राज्यात हे प्रकरण ताजे असतानाच आता गोव्यातील फोन टॅपिंगचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातील ट्विट केले आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरू आहे. सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर त्यांचे फोन टॅपिंग सुरू आहे. त्यामुळे गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दिगंबर कामत यांनी सांगितली हकीकत -

राऊत म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले होते. त्यांनासुद्धा त्यांचे फोन टॅप होत असल्याची भीती आहे. यावेळी गोव्यात भाजपची सत्ता येणे कठीण आहे. नेमकं चित्र दहा तारखे नंतर स्पष्ट होईल. दहा मार्च नंतर तिकडेही त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गोव्यात देखील केंद्राच्या सर्व तपास यंत्रणा सक्रिय होतील."

'आता देखील माझा फोन टॅप होतो'

"भाजप विरोधकांचे फोन टॅप करणारी व्यक्ती कोण आहे ? फोन टॅप करण्याचे आदेश देणारी व्यक्ती कोण आहे ? हे काही लपून राहिलेले नाही. 2019 झाली सत्ता नाट्यानंतर कॉंग्रेसचे नाना पटोले आणि माझा फोन टॅप होत असल्याचे आता समोर आल आहे. महाराष्ट्र पोलीस त्याच्यावरती कारवाई करतीलच. पण, माझा फोन आतादेखील टॅप केला जातो." असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Last Updated :Mar 5, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.