ETV Bharat / city

Uddhav Thackeray; सगळ्यात मोठं टेंशन: डास, मुंगी चावली तर खाजवायचं कसं; मुलाखतीवरुन उद्धव ठाकरे व संजय राऊत ट्रोल

author img

By

Published : Jul 26, 2022, 4:06 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून ही मुलाखत 26 आणि 27 तारखेला प्रसारित होणार आहे. मात्र मुलाखतीच्या काही व्हिडिओवरुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे प्रचंड ट्रोल होत आहेत.

Uddhav Thackeray And Sanjay Raut Trolled
उद्धव ठाकरे व संजय राऊत

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Takes Uddhav Thackeray Interview ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शिवसेनेच्या मुखपत्रातून 26 आणि 27 जुलैला प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीतील काही व्हिडिओ खासदर संजय राऊत यांनी सोशल माध्यमांवर अपलोड केले आहेत. मात्र या व्हिडिओवरुन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Trolled In Social Media ) यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यातीलच 'सगळ्यात मोठं टेंशन होतं, डा, किवी मुंगी चावली तर खाजवायचं कसं' हा व्हिडिओ तर सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे.

सगळ्यात मोठं टेंशन 'कसं खाजवायचं' - खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Takes Uddhav Thackeray Interview ) यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सोशल माध्यमातून चांगलीच टीका होत आहे. यात संजय राऊत यांना बोलताना उद्धव ठाकरे आजारपणातील किस्सा सांगत आहेत. त्यामुळे आपण आजारी असताना बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडण्याचा कट रचल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र आपणाला आजारपणात काही कळत नव्हते. हातपाय बधीर असताना ते हलवताही येत नव्हते. यात सगळ्यात मोठं टेंशन होतं, मुंगी किंवा डास चावली तर खाजवायचं कसं, असे उद्धव ठाकरे बोलताना या व्हिडिओत दिसत आहे. मात्र या व्हिडिओने सोशल माध्यमात मोठी धमाल उडवली आहे.

नितेश राणेंनीही साधला निशाना - भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane Criticize To Uddhav Thackeray ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत ( Sanjay Raut Takes Uddhav Thackeray Interview ) यांनी घेतलेल्या मुलखतीवर निशाना साधला आहे. उद्धव राऊत भाजपवर टीका करताना "त्यांचं ते माझं, माझं ते माझं" असे बोलत आहेत. त्यावर निलेश राणे यांनी 'व्वा उद्धवसाहेब . . अखेर तुम्ही “पाटणकर”आणि “सरकारी भाचा” बद्दल स्पष्टच बोललात! मानलं तुम्हाला!! ' अशी खोचक टीका केली आहे.

  • वाह! उद्धव साहेब!!
    अखेर तुम्ही “पाटणकर”आणि “सरकारी भाचा” बद्दल स्पष्टच बोललात!

    मानलं तुम्हाला!! pic.twitter.com/3EKkmHLZLJ

    — nitesh rane (@NiteshNRane) July 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कधी होणार मुलाखत प्रसारित - उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसारित करण्यात येणार आहे. मात्र या मुलाखतीवर विरोधकांसह सोशल माध्यमातून ट्रोल करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.