Sheena Bora Murder Case : शीना बोराचा 'बॉयफ्रेंड' राहुल मुखर्जीला कोरोनाची लागण, आता २७ मे रोजी होणार साक्ष

author img

By

Published : May 13, 2022, 1:48 PM IST

Sheena Bora Murder Case

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य साक्षीदार असलेल्या शीना हिचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जीला कोरोनाची लागण झाली ( Rahul Mukherjee Infected With Covid ) आहे. त्यामुळे त्याची साक्ष आता २७ मे रोजी घेण्यात येणार आहे.

मुंबई- शहरातील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणात ( Sheena Bora Murder Case ) मुख्य साक्षीदार शीना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात आज साक्ष देण्याकरिता येणार होता. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आज साक्ष देण्याकरीता न्यायालयात येऊ शकत ( Rahul Mukherjee Infected With Covid ) नाही, अशी माहिती राहुल मुखर्जीच्या वकिलाने न्यायालयासमोर दिल्यानंतर आता या प्रकरणात साक्षी देण्याकरिता 27 मे रोजी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील राहुल मुखर्जी हा पीटर मुखर्जीचा मुलगा आहे. तसेच शीना बोराचा प्रियकर असल्याने या खटल्यांमध्ये त्याची साक्ष अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. राहुल मुखर्जी 27 मे रोजी सत्र न्यायालयात साक्षी देण्याकरिता हजर राहण्याचे निर्देश विशेष सीबीआय कोर्टाने आज दिले आहे.


पत्रात आणखी काय लिहिलंय? : सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की, नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले. जिने तिला सांगितलं की, ती काश्मीरमध्ये शीना बोराला भेटली होती. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणीनं केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून, ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे. तसेच इंद्राणी मुखर्जीने नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.



फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो? : एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुली जबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.



काय आहे प्रकरण ?: इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

हेही वाचा : Sheena Bora Murder Case : शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, सीबीआयकडून उत्तर दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.