ETV Bharat / city

MAHA VIDHAN SABHA : शरद पवारांची पहिली निवडणूक.. विक्रमी विजय अन् काँग्रेसचे विभाजन

author img

By

Published : Sep 24, 2019, 5:13 AM IST

Updated : Sep 24, 2019, 8:54 AM IST

विधानसभा निवडणूक १९६७

महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचा बिगुल वाजला असून दिवाळीपूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. संपूर्ण राज्यभर निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्राने अनेक चढउतार पाहिले आहेत. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या मंगल कलशानंतर एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या १४ लेखांच्या विशेष लेखमालिकेतून..

मुंबई - महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभेसाठी २१ फेब्रुवारी १९६७ रोजी निवडणूक घेण्यात आली. १९६२ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २६४ मतदारसंघ होते पण १९६७ च्या निवडणुकीत त्यांची संख्या वाढून २७० झाली. यातील ६३ मतदारसंघ विदर्भात होते. या निवडणुकीत २७० पैकी २०२ जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी २ कोटी २१ लाख ४७ हजार ३२२ इतके नोंदणीकृत मतदार होते. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी १३ लाख ४३ हजार ७३२ तर महिला मतदारांची संख्या होती १ कोटी ८० लाख ३ हजार ५९०. त्यापैकी ६४.८४ टक्के म्हणजे १ कोटी, ४३ लाख ५९ हजार५७७ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. २७० जागांसाठी एकूण १२४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती केवळ १९, यातील ९ महिला निवडून विधानसभेत पोहोचल्या होत्या.

१९६७ च्या निवडणुकीत एकूण २७० पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २३९ त्यानंतर अनुसुचित जाती १५ व अनुसुचित जमाती प्रवर्गातून १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ९ लाख ८७ हजार ८४२ मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी ६.८८ इतकी होती.या निवडणुकीत २७० पैकी तब्बल २०३ जागा जिंकून काँग्रेसने राज्याच्या राजकारणावरील आपला दबदबा कायम राखला. काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी तब्बल ४७.०३ टक्के इतकी होती. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाचे नाव होते शेतकरी कामगार पक्ष आणि यांना मिळालेल्या जागा होत्या १९. शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत मिळवलेल्या मतांची टक्केवारी होती केवळ ७.८० टक्के.त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ८, कम्युनिस्ट पक्षाला १०, रिपब्लिकन पार्टीला ५ आणि जनसंघाला ४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत १६ अपक्षही निवडून आले होते. या निवडणुकीतील काँग्रेसने विक्रम केला व तो अजूनपर्यंत अबाधित आहे.या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी त्र्यंबक भराडे यांचीच पुर्ननिवड करण्यात आली. भराडे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते.

Assembly Elections
सौ. सोशल मीडिया

मुख्यमंत्रीपदी पुन्हा वसंतराव नाईक -

या निवडणुकीनंतर वसंतराव नाईकांकडेच मुख्यमंत्रीपद गेले व मुख्यमंत्री पदाची ५ वर्षाची टर्म पूर्ण करण्याचा विक्रम पहिल्यांदा त्यांच्याच नावावर नोंदला गेला आहे. नाईक बंजारा समाजातून येत असूनही आपल्या धोरणीपणामुळे त्यांनी सलग 11 वर्षं 2 महिने आणि 15 दिवस इतके दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.

एकदा सेनापती बापट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसले होते. मात्र मुख्यमंत्री नाईक बापट यांच्याशी इतक्या लीनतेने व नम्रतेने वागले की बापटांनी आपले उपोषण स्थळ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात हलवावे लागले. आपल्या मुत्सद्दीपणाने नाईक यांनी हे आंदोलन प्रसिद्धीपासून रोखले.

तसेच अमरावतीचे वयोवृद्ध समाजसेवक शिवाजीराव पटवर्धन आपल्या महारोगविषयक अभियानाच्या कामाबाबत नोकरशाहीकडून अडवणूक झाल्यास काठी आपटत सचिवालयात येत. त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री नाईक आपल्या दालनातून बाहेर येत व त्यांच्या पायावर नतमस्तक होत. त्यामुळे पटवर्धनांचा निम्मा राग पळून जात असे. त्याचबरोबर कोणीही तावातावाने तक्रार करावयास आल्यास मुख्यमंत्री त्याच्या खाद्यांवर हात ठेऊन त्याच्याशी नम्रतेने वागत. असे करण्याने तक्रारदाराची सरकारविरोधात कोणतीच तक्रार रहात नसे, असे अनेक किस्से त्यावेळी सांगितले जात असत.

Assembly Elections
सौ. सोशल मीडिया

काँग्रेसचा 'हा' विक्रम अजूनही अबाधित -

१९६२ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी शेतीविषयक अनेक विकास योजना सुरू केल्या. रोजगार हमी व गरीबी हटाव सारख्या योजनांच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान उंचावले. त्यामुळे १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २०२ जागांपर्यंत मजल मारली. हा आकडा ओलांडण्याची संधी यावर्षी भाजपकडे आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही भाजप बहुमतापर्यंतही पोहोचला नव्हता. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचा हा विक्रम भाजप मोडते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जाणता 'राजा' शरद पवारांची राजकारणात एंट्री -

सन १९६७ ची विधानसभा निवडणूक राज्याच्या राजकारणात एक मैलाचा दगड ठरली. कारण आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालणारे व धडाडीचे नेते शरद पवार यांचा राजकारणाच्या क्षितीजावर उदय झाला. १९६७ मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे २६ वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतून विधानसभा लढण्याची ऑफर दिली. याला यशवंतराव चव्हाणही अनुकूल होते. परंतु मतदारसंघातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत पवारांच्या नावाला विरोध केला.

Assembly Elections
सौ. सोशल मीडिया

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने १ विरुद्ध ११ असा निकाल कळवला. जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला. हे ठराव यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे चर्चेला आले. 'शरद नवखा आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे. त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही' अशी भूमिका मांडून अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटले.

या परिस्थितीतही प्रदेशाध्यक्ष पाटील व यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. यशवंतरावांनी म्हटले, की जर काँग्रेसचे ८० ते ९० उमेदवार पराभूत होणार असतील तर त्यात आणखी एकाची भर पडेल. परंतु उमेदवारी शरद पवार यानांच द्या. अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या विरोधासाठी फळी उघडली. मात्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवावर्ग आला. व एकीकडे बुजुर्ग तर दुसरीकडे युवा पिढी अशी स्थिती मतदारसंघात तयार झाली. युवा पीढीने त्या वर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मताधिक्याने विजयी केले. याच बारामतीने पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री व राज्याला एक खंबीर नेतृत्व दिले.

Assembly Elections
सौ. सोशल मीडिया

यादरम्यान केंद्राच्या पंचवार्षिक योजनांचा सुट्टीचा काळ होता व एक-एक वर्षांच्या तीन सरकत्या योजनांवर अंमलबजावणी करण्यात आली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नियोजन आयोग स्थापन करण्यात येऊन पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. या काळात गरीबी हटाव व ग्रामीण रोजगार गमी योजना राबविण्यात आली.

१९६७ ची विधानसभा निवडणूकही लोकसभा निवडणुकीसोबत घेण्यात आली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशपातळीवर गाजली होती. कारण एकीकडे शेकापकडून निवडणूक रिंगणात होत्या कोल्हापूरच्या राणीसाहेब विजयमाला तर त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे उमेदवार लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात. दोन्ही तुल्यबळ उमेदवार होते. त्यामुळे देशभरातील जनतेचे व प्रसारमाध्यमांचे या लढतीकडे लक्ष लागले होते. शेवटी शेकापचा गड असलेल्या या मतदारसंघात विजयमाला राणीसाहेबांनी विजय मिळवला.

काँग्रेसचे विभाजन -

१२ नोव्हेंबर १९६९ रोजी पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून काँग्रेसने इंदिरा गांधी (तत्कालीन पंतप्रधान) यांना पक्षातून निलंबित केले. त्यावेळी इंदिरांना मानणारा एक गट पक्षात होता. त्यामुळे पक्षात फूट पडली. इंदिरा गांधींनी काँग्रेस (आर) ची स्थापना केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील ७०५ सदस्यांपैकी ४४६ सदस्य इंदिरा यांच्या पक्षात गेले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सिंडिकेट तर इंदिरा गटाला इंडीकेट म्हटले जात असे. कामराज आणि मोरारजी देसाई मुख्य काँग्रेससोबत राहिले. तर महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील शरद पवार आदि राज्यातील बडे नेतेही सिंडीकेटबरोबर राहिले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री वसंत नाईक यांची सत्तेवरील पकड ढिली होऊ लागली.

महाराष्ट्राची जडणघडण होत असताना वसंतराव खंबीरपणे यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्री झाल्यावरही अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला एकसंध केले. त्यांच्या हरितक्रांतीनेच महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणले. राज्यातील उद्योग व धरणांची निर्मिती तसेच नवी मुंबईची स्थापना यात त्यांचा वाटा मोलाचा होता

Intro:Body:

MAHA VIDHAN SABHA : शरद पवारांची पहिली निवडणूक.. विक्रमी विजय अन् काँग्रेसचे विभाजन

महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचा बिगुल वाजला असून दिवाळीपूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. संपूर्ण राज्यभर निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्राने अनेक चढउतार पाहिले आहेत. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या मंगल कलशानंतर एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या १४ लेखांच्या विशेष लेखमालिकेतून..

महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभेसाठी २१ फेब्रुवारी १९६७ रोजी निवडणूक घेण्यात आली. १९६२ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २६४ मतदारसंघ होते पण १९६७ च्या निवडणुकीत त्यांची संख्या वाढून २७० झाली. यातील ६३ मतदारसंघ विदर्भात होते.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी  २ कोटी २१ लाख ४७ हजार ३२२ इतके नोंदणीकृत मतदार होते. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी १३ लाख ४३ हजार ७३२ तर महिला मतदारांची संख्या होती १ कोटी ८०  लाख ३  हजार ५९०.  त्यापैकी ६४.८४ टक्के म्हणजे १ कोटी, ४३ लाख ५९ हजार५७७ मतदारांना आपला हक्क बजावला होता. २७० जागांसाठी एकूण १२४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती केवळ १९ यातील ९ महिला निवडून विधानसभेत पोहोचल्या होत्या.

१९६७ च्या  निवडणुकीत एकूण २७० पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २३९ त्यानंतर अनुसुचित जाती १५  व अनुसुचित जमाती प्रवर्गातून १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ९ लाख ८७ हजार ८४२  मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी ६.८८ इतकी होती.

या निवडणुकीत २७० पैकी तब्बल २०३ जागा जिंकून काँग्रेसने राज्याच्या राजकारणावरील आपला दबदबा कायम राखला. काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी तब्बल ४७.०३ टक्के इतकी होती. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाचे नाव होते शेतकरी कामगार पक्ष आणि यांना मिळालेल्या जागा होत्या १९. शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत मिळवलेल्या मतांची टक्केवारी होती केवळ ७.८० टक्के.

त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ८, कम्युनिस्ट पक्षाला १०, रिपब्लिकन पार्टीला ५ आणि जनसंघाला ४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत १६ अपक्षही निवडून आले होते. या निवडणुकीतील काँग्रेसने विक्रम केला व तो अजूनपर्यंत अबाधित आहे.

या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी त्र्यंबक भराडे यांचीच पुर्ननिवड करण्यात आली. भराडे हे  सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते.

वसंतराव नाईकांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म -

या निवडणुकीनंतर वसंतराव नाईकांकडेच मुख्यमंत्रीपद गेले व मुख्यमंत्री पदाची ५ वर्षाची टर्म पूर्ण करण्याचा विक्रम पहिल्यांदा त्यांच्याच नावावर नोंदला गेला आहे. नाईक बंजारा समाजातून येत असूनही आपल्या धोरणीपणामुळे त्यांनी सलग 11 वर्षं 2 महिने आणि 15 दिवस इतके दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.

एकदा सेनापती बापट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसले होते. मात्र मुख्यमंत्री नाईक बापट यांच्याशी इतक्या लीनतेने व नम्रतेने वागले की बापटांनी आपले उपोषण स्थळ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात हलवावे लागले. आपल्या मुत्सद्दीपणाने नाईक यांनी हे आंदोलन प्रसिद्धीपासून रोखले.

तसेच अमरावतीचे वयोवृद्ध समाजसेवक शिवाजीराव पटवर्धन आपल्या महारोगविषयक कामाबाबत नोकरशाहीकडून अडवणूक झाल्यास काठी आपटत सचिवालयात येत. त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री नाईक आपल्या दालनातून बाहेर येत व त्यांच्या पायावर नतमस्तक होत. त्यामुळे पटवर्धनांचा निम्मा राग पळून जात असे. त्याचबरोबर कोणीही तावातावाने तक्रार करावयास आल्यास मुख्यमंत्री त्याच्या खाद्यांवर हात ठेऊन त्याच्याशी नम्रतेने वागत. असे करण्याने तक्रारदाराची सरकारविरोधात कोणतीच तक्रार रहात नसे. असे अनेक किस्से   

काँग्रेसचा 'हा' विक्रम अजूनही अबाधित -

१९६२ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी शेतीविषयक अनेक विकास योजना सुरू केल्या. रोजगार हमी व गरीबी हटाव सारख्या योजनांच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान उंचावले. त्यामुळे १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २०२ जागांपर्यंत मजल मारली. हा आकडा ओलांडण्याची संधी यावर्षी भाजपकडे आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही भाजप बहुमतापर्यंतही पोहोचला नव्हता. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचा हा विक्रम भाजप मोडते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जाणता 'राजा' शरद पवारांची राजकारणात एंट्री -

सन १९६७ ची विधानसभा निवडणूक राज्याच्या राजकारणात एक मैलाचा दगड ठरली. कारण आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालणारे व धडाडीचे नेते शरद पवार यांचा राजकारणाच्या क्षितीजावर उदय झाला.  १९६७ मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे २६ वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतून विधानसभा लढण्याची ऑफर दिली. याला यशवंतराव चव्हाणही अनुकूल होते. परंतु मतदारसंघातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत पवारांच्या नावाला विरोध केला.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने १ विरुद्ध ११ असा निकाल कळवला. जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला. हे ठराव यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे  चर्चेला आले. 'शरद नवखा आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे. त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही' अशी भूमिका मांडून अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटले.

या परिस्थितीतही प्रदेशाध्यक्ष पाटील व यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. यशवंतरावांनी म्हटले, की जर काँग्रेसचे ८० ते ९० उमेदवार पराभूत होणार असतील तर त्यात आणखी एकाची भर पडेल. परंतु उमेदवारी शरद पवार यानांच द्या. अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या विरोधासाठी फळी उघडली. मात्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवावर्ग आला. व एकीकडे बुजुर्ग तर दुसरीकडे युवा पिढी अशी स्थिती मतदारसंघात तयार झाली. युवा पीढीने त्या वर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मताधिक्याने विजयी केले. याच बारामतीने पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री व राज्याला एक खंबीर नेतृत्व दिले.

यादरम्यान केंद्राच्या पंचवार्षिक योजनांचा सुट्टीचा काळ होता व एक-एक वर्षांच्या तीन सरकत्या योजनांवर अंमलबजावणी करण्यात आली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नियोजन आयोग स्थापन करण्यात येऊन पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. या काळात गरीबी हटाव व ग्रामीण रोजगार गमी योजना राबविण्यात आली.

१९६७ ची विधानसभा निवडणूकही लोकसभा निवडणुकीसोबत घेण्यात आली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशपातळीवर गाजली होती. कारण एकीकडे शेकापकडून निवडणूक रिंगणार होत्या कोल्हापूरच्या राणीसाहेब विजयमाला तर त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे उमेदवार लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात. दोन्ही तुल्यबळ उमेदवार होते त्यामुळे देशभरातील जनतेचे व प्रसारमाध्यमांचे या लढतीकडे लक्ष लागले होते. शेवटी शेकापचा गड असलेल्या या मतदारसंघात विजयमाला राणीसाहेबांनी विजय मिळवला.

काँग्रेसचे विभाजन -

१२ नोव्हेंबर १९६९ रोजी पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून काँग्रेसने इंदिरा गांधी (तत्कालीन पंतप्रधान) यांना पक्षातून निलंबित केले. त्यावेळी इंदिरांना मानणारा एक गट पक्षात होता. त्यामुळे पक्षात फूट पडली. इंदिरा गांधींनी काँग्रेस (आर) ची स्थापना केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील ७०५ सदस्यांपैकी ४४६ सदस्य इंदिरा यांच्या पक्षात गेले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सिंडिकेट तर इंदिरा गटाला इंडीकेट म्हटले जात असे. कामराज आणि मोरारजी देसाई मुख्य काँग्रेससोबत राहिले. तर महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील शरद पवार आदि राज्यातील बडे नेतेही सिंडीकेटबरोबर राहिले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री वसंत नाईक यांची सत्तेवरील पकड ढिली होऊ लागली.

महाराष्ट्राची जडणघडण होत असताना वसंतराव खंबीरपणे यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्री झाल्यावरही अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला एकसंध केले. त्यांच्या हरितक्रांतीनेच महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणले. राज्यातील उद्योग व धरणांची निर्मिती तसेच नवी मुंबईची स्थापना यात त्यांचा वाटा मोलाचा होता

Conclusion:
Last Updated :Sep 24, 2019, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.