ETV Bharat / city

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाचा दिलासा

author img

By

Published : Oct 10, 2022, 3:54 PM IST

Anil Deshmukh
Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सत्र न्यायालया कडून दिलासा मिळाला आहे. (relief to Anil Deshmukh). देशमुख यांनी अँजिओग्राफी साठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून मंजूर झाला आहे.

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सत्र न्यायालया कडून दिलासा मिळाला आहे. (relief to Anil Deshmukh). देशमुख यांनी अँजिओग्राफी साठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांना खाजगी जसलोक रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली गेली आहे.

काय आहेत आरोप ? : अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या आरोपांनुसार, पोलीस अधिकारी सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली होती, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला हे पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

मनी लाँड्रिंग आरोप: देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी त्यांच्यावर ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानंतर त्या वर्षी 21 एप्रिल रोजी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. 20 मार्च 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी आरोप केला होता की - देशमुख यांनी वाझे यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांना दरमहा बारमधून 100 कोटी गोळा करण्याची आदेश दिले होते. अँटिलिया स्फोटकांचा धाक आणि त्यानंतर ठाणे येथील कार अॅक्सेसरीजचे दुकान मालक मनसुख हिरण यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने वाझेला अटक केली (Anil Deshmukh case) आहे.

कधी झाली होती अटक - अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी 'ईडी'ने अटक केली होती. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुखांवर शंभर कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला होता. 'ईडी'ने याप्रकरणी देशमुख यांना अटक केली होती. (Why was Anil Deshmukh Arrested) ईडीने याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स पाठवले होते, पण ते एकदाही हजर झाले नव्हते. ते नॉटरिचेबल झाले होते. अखेर 1 नोव्हेंबर रोजी सकाळी ते स्वतःहून 'ईडी'समोर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंहसुद्धा होते. अधिकाऱ्यांनी तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.