ETV Bharat / city

Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जवर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

author img

By

Published : Oct 6, 2022, 3:58 PM IST

Updated : Oct 6, 2022, 6:10 PM IST

Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जवर ( Bail application of Anil Deshmukh ) सीबीआयला ( CBI ) उत्तर दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचा उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

मुंबई - Anil Deshmukh Bail Application : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जवर ( Bail application of Anil Deshmukh ) सीबीआयला ( CBI ) उत्तर दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचा उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सीबीआयला 14 ऑक्टोंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

विशेष कोर्टाचे सीबीआयला निर्देश - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष सीबीआय कोर्टाने सीबीआयला दिले आहे. 14 ऑक्टोंबर पर्यंत जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे विशेष कोर्टाचे सीबीआयला निर्देश दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने PMLA प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआय कोर्टामधून देखील जामीन मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीएमएलएटी नुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जामीन दिल्यानंतर त्याच मुद्द्यांच्या आधारे विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील प्रमुख मुद्द्यांचा देखील या अर्जामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात सर्वात प्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता या आजारावर ईडीने ईसीआर नोंदवत अनिल देशमुख यांना अटक केली होती.

अनिल देशमुख यांचे वकील
शंभर कोटी कथित वसुली प्रकरण - माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करण्यात यावा अशी मागणी वकील जयश्री पाटील यांनी केल्यानंतर या प्रकरणात सीबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर चालू वर्षा मध्ये एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सीबीआयने अटक केले होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणातील सह आरोपीस निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सर्वात प्रथम अनिल देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, याच आरोपीच्या साक्षेवर अविश्वास असल्याचे नोंद उच्च न्यायालयाने केल्यामुळे आता या प्रकरणात सीबीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने PMLA प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर (Anil Deshmukh Bail) सीबीआय कोर्टामधून देखील जामीन मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जाला अद्याप सत्र न्यायालयातून आउटलेट नंबर प्राप्त झालेला नाही आहे. 6 ऑक्टोबरला अर्जावर नंबरिंग होण्याची शक्यता आहे.

सीबीआयने केली होती अटक: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करण्यात यावा अशी मागणी वकील जयश्री पाटील यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना सीबीआयने अटक केली होती.

केवळ एकाच प्रकरणात जामीन मंजूर: सीबीआयच्या तक्रारीच्या आधारे ईडीने देशमुखांवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र ते सीबीआय प्रकरणात सुद्धा अटकेत असल्याने त्यांना अद्याप कारागृहा बाहेर येता येणार नाही. त्यामुळेच सीबीआय प्रकरणात देखील अनिल देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उद्या दसऱ्या निमित्त न्यायालयाला सुट्टी असल्याने 6 ऑक्टोबर रोजी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून नंबरिंग होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यातच अनिल देशमुख यांच्या वतीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती देखील न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीबीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष - अनिल देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणातील सह आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सीबीआयच्या विशेष कोर्टाने मंजुरी दिली आहे. मात्र याच आरोपीच्या साक्षेवर अविश्वास असल्याचे नोंद उच्च न्यायालयाने केल्यामुळे आता या प्रकरणात सीबीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated :Oct 6, 2022, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.