ETV Bharat / city

12th Result : यश न मिळालेल्या विद्यार्थांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन

author img

By

Published : Jun 8, 2022, 8:28 PM IST

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे पालक आणि शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड

मुंबई - उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असे आवाहन सुद्धा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.


बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.


यावर्षी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मंडळांमधून एकूण 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी (94.22 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विशेषत: यंदाचा निकाल हा फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही अनेक आव्हानांना सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वीपणे लावल्याबद्दल राज्य मंडळाचे आणि विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे वर्षा गायकवाड यांनी विशेष आभार मानले आहेत.

हेही वाचा - 12th Class Result : बारावीचा निकाल जाहीर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्याचा जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.