ETV Bharat / city

Shiv sena on President Election: राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही- संजय राऊत

author img

By

Published : Jul 12, 2022, 10:11 AM IST

Updated : Jul 12, 2022, 5:51 PM IST

Shiv Sena's support to Murmu
शिवसेनेचा मुर्मू यांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय खासदार यांनी मांडली. खासदारांची मत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई- राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ( draupadi murmu ) यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय खासदार यांनी मांडली. खासदारांची मत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. मातोश्री येथे खासदारांच्या बैठकीतून नाराजीने गेल्याची चर्चा चुकीचे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक- 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार करत आहेत. ठाकरेंवर खासदारांचाही दबाव वाढत आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी बंड केल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक झाली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीला किती खासदार: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी तब्बल 7 खासदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय बैठकीत होणार होता. आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यातच खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे खासदाराही खरेच बंड करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे खासदार उपस्थित : उपस्थित खासदारांमधे गजानन कीर्तिकर - उत्तर मुंबई, अरविंद सावंत - मुंबई दक्षिण, विनायक राउत - रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धैर्यशील माने - हातकणंगले, हेमंत गोडसे - नाशिक, राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई, श्रीरंग बारणे - पिंपरी चिंचवड, प्रताप जाधव - बुलढाणा, सदशिव लोखंडे - शिर्डी, ओमराजे निंबाळकर- उस्मानाबाद, राजेंद्र गावित- पालघर,राजन विचारे - ठाणे, ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांची बैठकीला हजेरी होती.

हे खासदार गैरहजर: गैरहजर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम - भावना गवळी, परभणी - संजय जाधव, कोल्हापूर - संजय मांडलिक, हिंगोली - हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे, रामटेक - कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर यांचा समावेश होता. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे. तुमाने यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला होता तसेच मी दिल्लीत नव्हतोच असे म्हणले होते.

भाजपा समर्थित आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आदी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांना मैदानात उतरविले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्यामुळे उद्धव ठाकरे हे आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

काय आहे पत्रात ? : दिवंगत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार तथा पहिल्या मराठी भाषिक प्रतिभा पाटील तसेच प्रणय मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता आणि दोघेही देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. या गोष्टीचे स्मरण करून आपण आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन आदिवासी समाजाचा सन्मान करावा, त्या देशाच्या आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास देशातील तमाम आदिवासी समाज आपला ऋणी राहील, अशा विनंतीचे पत्र खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

खासदारांचे ऐकावे नाही तर झटका बसेल-आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची अधोगती सुरु झाली आहे. त्यातच आता एनडीए राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदारांकडून होत आहे. त्यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांचं ऐकावं अन्यथा त्यांना अजून एक मोठा झटका भेटेल, असेही त्यांनी म्हटलं. ते 'ईटिव्ही भारत'शी बोलत ( girish maharaj on uddhav thackeray ) होते. गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांच ऐकावं अन्यथा त्यांना अजून एक मोठा झटका भेटेल. या मुद्द्यावरून शिवसेनेचे १३ खासदार बंड पुकारू शकतात. तसेच, शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीच्या निर्णयाचं स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा - 18 तारखेला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा ? यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत संजय राऊत आता इतर सर्व खासदारांनी द्रौपदीमुळे यांना पाठिंबा देण्याचा आवाहन उद्धव ठाकरे यांना केलं. या बैठकीत संजय राऊत एकटे पडल्याचं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं. मात्र, या बैठकीत नेमकं काय घडलं ? यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांची बोलत होते.

पहिल्या आदिवासी समाजातील राष्ट्रपती - यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सोमवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत ते सर्व सदस्यांची मत जाणून घेत असतात आणि त्यानंतरच आपला निर्णय घेत असतात. द्रौपदी मुर्मु या पहिल्या आदिवासी समाजातील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. राजकारणात देखील अनेक आदिवासी समाजाचे नेते कार्यकर्ते सक्रिय आहेत."

म्हणजे भाजपला पाठिंबा नाही - पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "द्रोपती मुर्मु यांच्या बद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येकाच मत आम्ही समजून घेतल आहे. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. या बाबत जो काही निर्णय असेल तो आमचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे जाहीर करतील." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे - मागच्या काही दिवसातील आपण घडामोडी पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व विरोधी पक्ष संपवण्याचा षड्यंत्र सुरू आहे. देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे. यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत. लोक भावना काय आहे यानुसार निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे."

हेही वाचा-Sanjay Raut on Supreme court :'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली - संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचाShiv Sena Vs Eknath Shinde: 'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली निकाल येईल' आजच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया

Last Updated :Jul 12, 2022, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.