ETV Bharat / city

माझे नाव दाऊद कधीच नव्हते - समीर वानखडे यांच्या वडिलांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Oct 25, 2021, 7:13 PM IST

Updated : Oct 25, 2021, 9:54 PM IST

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे म्हणाले, की माझे नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे. जन्मापासून ज्ञानदेव वानखेडे असे नाव आहे. माझ नाव दाऊद कधीही नव्हते. जन्मापासून माझे नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे आहे.

समीर वानखडे
समीर वानखडे

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरू आहेत. नवाब मलिक यांनी टि्वटरवर एक जन्म दाखला शेअर करुन समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता. त्यावर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण केले आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेदेव वानखेडे म्हणाले, की माझे नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे. जन्मापासून ज्ञानदेव वानखेडे असे नाव आहे. माझे नाव दाऊद कधीही नव्हते. जन्मापासून माझे नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे आहे. शाळा, कॉलेज, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून निवृत्त होईपर्यंत माझे ज्ञानदेव वानखेडे नाव आहे. कोणी तरी हा खोडकरपणा केला आहे, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

माझे नाव दाऊद कधीच नव्हते

हेही वाचा-आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता

समीर वानखेडे मुस्लीम आहेत का? हा वाद नेमका काय आहे?

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट करत “पैचान कौन?” इतकंच लिहित वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे हे दलीत असून त्यांना लक्ष्य केले जात असल्याची टीका मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. त्यानंतर समीर हे दलीत नसून मुस्लीम असल्याचा खळबळजनक खुलासा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यासाठी त्यांनी समीर यांच्या जन्माचे प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यानंतर समीर यांनी हे गोष्ट फेटाळली होती.

हेही वाचा-एनसीबी आणि प्रभाकर साईलच्या सुरक्षा मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा - गृहमंत्री

काय म्हणाले समीर वानखेडे -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी माझ्याशी संबंधित काही कागदपत्रे ट्विट केले आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे हिंदु असून ते निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. तसेच माझी आई जाहीदा ही मुस्लीम होती. मी एक धर्मनिरपेक्ष परिवारातील असून मला त्याचा गर्व आहे. माझा 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी माझा विवाह झाला होता. नंतर 2016 मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

हेही वाचा-"तीन वर्षांत देशातील सर्व रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे" ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरींचा विश्वास

दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीची तीन सदस्यीय टीम उद्या दिल्लीहून मुंबईला जाणार आहे. या टीममध्ये NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग आणि 2 निरीक्षक स्तरावरील अधिकारी असतील.

Last Updated :Oct 25, 2021, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.