ETV Bharat / city

2 Years Complete MVA Govt : ...हा विनोदच! आजही सरकार पाडण्याची तारीख देतायेत; सामनातून टीका

author img

By

Published : Nov 28, 2021, 9:49 AM IST

Updated : Nov 28, 2021, 10:50 AM IST

मागच्या दोन वर्षात सरकार पाडू न शकलेला विरोधीपक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद महणाला लागेल, असा टोला सामनातून ( Saamana ) भाजपाला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) दोन वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्त सामनातून ( Saamana Editorial ) निशाणा साधला आहे.

सामनातून टीका
सामनातून टीका

मुंबई - महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला ( Thackeray government ) दोन वर्षे होत आहेत. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. मागच्या दोन वर्षात सरकार पाडू न शकलेला विरोधीपक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद महणाला लागेल, असा टोला सामनातून ( Saamana )भाजपाला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) दोन वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्त सामनातून ( Saamana Editorial ) निशाणा साधला आहे.

बिलो द बेल्ट ( Below The Belt ) -

मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात 'बिलो द बेल्ट' म्हटले जाते. ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम आहे. विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षातील अचिव्हमेंट काय ती पहा...

  1. भष्ट्राचार व गैरव्यवहाराचे आरोप पुराव्याशिवाय करणे व फक्त धुरळा उडवणे. ते उद्योग आजही सुरूच आहे.
  2. सुशांतसिंह राजपूतसारख्या ( Sushant Singh Rajput ) प्रकरणांना राजकिय रंग देऊन ठाकरे व कुटुंब ( Thackeray and family ) व सरकारला बदनाम करणे. या प्रकरणात कारण नसताना सीबीआयला घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवर पहिला प्रहार विरोधीपक्षाने केला.
  3. महाराष्ट्र पोलिसांना ( Maharashtra Police ) बदनाम करण्याची व खाकी वर्दीचे खच्चीकरण करण्याची एकही संधी विरोध पक्षाने सोडली नाही.
  4. महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात असे चित्र निर्माण केले व राष्ट्रीय महला आयोगाच्या ( National Commission for Women ) माध्यमातून राज्यावर चिखलफेक केली.
  5. परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप केले. त्यामागचे बोलवते धनी कोण हे स्पष्ट झाले आहे.
  6. फरारी परमबीर ( Param Bir Singh ) यांच्या आरोपांवर अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना ईडीने तुरूंगात टाकले. एकनाथ खडसे यांचे जावईदेखील अटकेत आहेत.
  7. शिवसेनेचे आमदार, खासदार यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकाविण्यात येत आहे.
  8. मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना खोट्या प्रकरणात ईडीने तुरूंगात टाकले. या प्रकरणाचे खरे सूत्रधार अधिकारी वानखेडे यांना विरोधी पक्षाने पाठबळ दिले.
  9. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे व शरद पवारांच्यावर खोटे आरोप केले.
  10. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळविण्यासाठी विरोधी पक्षाने घेतलेले कष्ठ अवर्णनीय आहेत. अमरावतीत जातीय दंगे भडकवून वातावरणात तणाव निर्माण केला.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ -

ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षात नेमके काय केले ते मी नंतर लिहीन, पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांत ते प्रिय आहेत. हा माणूस कारस्थानी नाही ही त्यांची ओळख बनली आहे. पवारांनी ठाकेरंना काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे व सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही हस्तक्षेप नाही. कोरोना काळात त्यांना लोकांना फॅमिली डॉक्टरप्रमाणे मार्गदर्शन केले. टीकेची पर्वी केली नाही. प्रसंगी कठोर वागले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे कोरोनाचे संकट थोडे मागे हटले.

Last Updated : Nov 28, 2021, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.