ETV Bharat / city

Dahi handi 2022: निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा पथक सज्ज; सरावाची जोरदार तयारी

author img

By

Published : Aug 8, 2022, 12:07 PM IST

Dahi handi 2022
Dahi handi 2022

Dahi handi 2022 : राज्यात नव्याने आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवासहित सर्वत्र सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 वर्ष कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक सण साजरे केले जात नव्हते. मात्र, यावेळी निर्बंधमुक्त सण साजरा करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे होऊ घातलेल्या गोपाळकाला सणासाठी सर्वच दहीहंडी मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबई - 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी ठाणे, मुंबई आणि उपनगर परिसरातील दहीहंडी पथक सज्ज झाली आहेत. या पथकांकडून थरावर थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे. राज्यात नव्याने आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवासहित सर्वत्र सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 वर्ष कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक सण साजरे केले जात नव्हते. कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नव्हते. मात्र, यावेळी निर्बंधमुक्त सण साजरा करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे होऊ घातलेल्या गोपाळकाला सणासाठी सर्वच दहीहंडी मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यावर्षी अनेक थर लावण्यासाठी दहीहंडी पथक सराव करत आहे.

Dahi handi 2022

दहीहंडी पथकांचा जोरदार सराव - गेल्या 2 वर्षे राज्यासह देशभरात कोरोनाची भीती होती. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आलेला नाही. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी होत असल्याने मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी एकावर एक मानवी मनोरे रचण्याचा जोरदार सराव सुरू केला आहे. समर्थ नगर, जोगेश्वरी पूर्व येथील आर्यन गोविंदा पथकाने 2 वर्षाच्या कोरोना काळातील बंदीनंतर मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू केला आहे. गेल्या 12 वर्ष हे गोविंदा मंडळ मुंबई तसेच मुंबई परिसरातील दहीहंडी उत्सवात भाग घेत असतं. 2019 यावर्षी शेवटची दहीहंडी खेळल्यानंतर गेली, 2 वर्ष सर्वच मंडळ आतुरतेने निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सवची वाट पाहत होते.

नियमांचं बंधन नसावं - या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे निर्बंधमुक्त दहीहंडी खेळता येणार आहे. त्यासाठी सर्वच दहीहंडी पथक सज्ज झाली आहेत. आर्यन गोविंदा मंडळातली मुलं रोज आपली काम आटपून रात्री सरावाला सुरुवात करतात. गोविंदा उत्सव साजरा करताना नियमांचं बंधन नसावं. स्पेनमध्ये ही सहाशे स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेस मानवी मनोरे लावले जातात. त्या वेळेस उंच अंतरावर लहान मुलांनाच चढवलं जातं. त्याचप्रमाणे गोविंदा उत्सव साजरा करताना लहान मुलांना वर तळण्याची अनुमति असली पाहिजे. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचं गोविंदा पथकाचे प्रशिक्षक निखिल नांदगावकर म्हणतात. यासोबतच यावेळी गोविंदा पथकांना 10 लाखाचा विमा देण्याचा जो विचार सुरू आहेत, याचा देखील स्वागत त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

दहीहंडीला उत्सवाचे बदलते आर्थिक स्वरूप - मुंबई ठाणे आणि उपनगर परिसरात एकूण अंदाजे 2 हजार लहान- मोठे गोविंदा पथक आहेत. हे सर्व पथक दहीहंडी उत्सवात भाग घेत असतात. या गोविंदा पथकात भाग घेणार्‍या तरुणांची संख्या मुंबई- ठाणे आली. या सर्व परिसरामध्ये दीड लाखापर्यंत तरुण सहभाग घेतात. दहीहंडी उत्सवात गेल्या काही वर्षापासून आर्थिक स्वरूप प्राप्त झालेला आहे. लाखांची बक्षीस उंचच- उंच बांधलेल्या अँड यांवर ती लावली जातात. एकूण या बक्षिसांचा आकडा कोट्यावधीच्या आसपास जातो. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल या दिवसांमध्ये होत असते. जास्तीत- जास्त बक्षिसाची रक्कम मिळवता यावी. यासाठी प्रत्येक पथक जास्तीत- जास्त दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करत असतात.

हेही वाचा - Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांनी केला एक कॉल; उद्योजकाचं असं बदललं नशीब

हेही वाचा - Abdul Sattar in trouble : शिंदे गटाचे अब्दुल सत्तार अडचणीत? दोन्ही मुलींची घोटाळ्यातील टीईटी प्रमाणपत्रे रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.