ETV Bharat / city

दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची जीवनवाहिनी; लोकलसह महत्वाच्या ठिकाणांची केली रेकी

author img

By

Published : Sep 15, 2021, 2:19 PM IST

दहशतवादी मुंबईसह देशभरात सणासुदीच्या काळात दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचा चौकशीत समोर आली आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे.

दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची जीवनवाहिनी
दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची जीवनवाहिनी

मुंबई - दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एक मोठी कारवाई करत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनची रेकी केली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकलची रेकी केल्याच्या माहितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक खुलाश्यानंतर आता लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी रेल्वेच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.

लोकलची रेकी केलीची कबुली -

दिल्ली पोलिसांनी काल सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील एक दहशतवादी मुंबईचा रहिवासी असून त्याचे नाव जान मोहम्मद असल्याची माहिती मिळत आहे. हे सहाही दहशतवादी मुंबईसह देशभरात सणासुदीच्या काळात दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचा चौकशीत समोर आली आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. यातील एका दहशतवाद्याने मुंबई लोकलची संपूर्ण रेकी केलीची कबुली दिली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

रेल्वे पोलिसांची बैठक सुरु -

अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईतील सायन परिसरात रहात होता. जान मोहम्मद अली शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण धारावीतील घरात राहत होते. जान मोहम्मद हा पेशाने ड्रायव्हर असून त्याच्यावर मुंबईची रेकी करण्याची जबाबदारी होती का? नेमका या दहशतवादी कटात त्याचा कितपत सहभागी होता? याबाबत सध्या तपास सुरु असल्याची माहिती, सुत्रांनी दिलेली आहे. मुंबईचा रेल्वे स्थानक आणि लोकल ट्रेनमध्ये यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा खळबळ उडाली आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांची या घटनेवरून उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठकीत सध्या सुरु असून या बैठीकीत रेल्वे सुरक्षेबाबद चर्चा होणार आहे.

हेही वाचा - दहशतवाद्यांना मदत करणारा 'अजगर' मुंबई पोलिसांच्या ताब्यात; गृहमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

हेही वाचा - दिल्लीतील सहा संशयित दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबईतील एकाचा समावेश, महाराष्ट्रही होता निशाण्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.