Mumbai Water Reduction : पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल, प्रशासकांनी तोडगा काढावा - रवी राजा

author img

By

Published : Mar 12, 2022, 8:38 AM IST

Mumbai Water Reduction

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात ( Bhatsa Dam ) पाणी घुसल्याने मागील महिन्यात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे महापालिकेने मुंबईत १५ टक्के पाणी कपात ( Water Cutting In Mumbai ) केली. या पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. याकडे पालिकेच्या प्रशासक पदावर बसलेल्या आयुक्तांनी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केली आहे.

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात ( Bhatsa Dam ) पाणी घुसल्याने मागील महिन्यात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे महापालिकेने मुंबईत १५ टक्के पाणी कपात ( Water Reduction In Mumbai ) केली. दुरुस्तीचे काम होईपर्यंत पाणी कपात लागू असेल, असे पालिका प्रशासनाने जाहिर केले आहे. मात्र, मुंबईच्या अनेक भागात महिना झाला तरी ६० टक्क्याहून अधिक पाणी कपात आहे. पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. याकडे पालिकेच्या प्रशासक पदावर बसलेल्या आयुक्तांनी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम -

यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत पुरेसा पाणी साठा आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील वर्षभराचे पाण्याचे टेन्शन दूर झाले होते. मात्र, भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बिघाड दुरुस्त होईपर्यंत ही कपात राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईच्या अनेक भागात उंचावर वसाहती वसल्या आहेत. त्यामुळे तेथे आधीच कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यात पाणी कपातीची भर पडली असल्याने येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. डोंगर भागात राहणाऱ्या मालाड, मालवणी, कुर्ला, कांदिवली, कुर्ला, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, मुलुंड, वाशीनाका, लाल डोंगर चेंबूर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांची परवड कायम आहे. त्यात पाणी कपातीमुळे रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. प्रशासनाकडून १५ टक्के पाणी कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक भागात ६० टक्के पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न केला जात होता. विविध सभांमधून समस्य़ांवर आवाज उठवला जात होता. मात्र, मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सर्व समित्या, नगरसेवकपद रद्द झाले आहेत. माजी नगरसेवकांकडून प्रशासनाकडे विचारणा केली जात असली तरी तेवढा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

पाणी पुरवठ्यासाठी अद्याप पर्यायी व्यवस्था नाही -

पॉवर हाऊसमध्ये पाणी शिरल्याने दुरुस्तीची व्याप्ती मोठी आहे. दुसरे गेट ओपन करून पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते याबाबतही प्रशासनाची चाचपणी सुरू आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून वैतरणा धरणातून २०० एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे १५ टक्के असलेली पाणी कपात कमी केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्याप अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. शिवाय बिघाड दुरुस्त झाल्याशिवाय पाणी कपात रद्द केली जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार अद्याप कायम आहे.

प्रशासकांनी तोडगा काढावा -

फेब्रुवारी महिन्यात भातसा वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने १५ टक्के पाणी कपात करण्यात आली. ही पाणी कपात काही दिवस असेल असते सांगण्यात आले. आता या बिघाडाला एक महिना होऊन गेला तरी अनेक भागात पाणी कपात आहे. मुंबईमध्ये अनेक विभागात आजही ६० टक्के पाणी कपात आहे. पालिकेवर सध्या आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. नागरिकांचे हाल होत असताना त्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासकाचे आहे. मुंबईत उन्हाळा सुरु झाला आहे, आता मार्चचा पहिला आठवडा आहे. पाणी कपात वाढत आहे. असेच सुरु राहिले तर उन्हाळ्याच्या काळात नागरिकांचे हाल होतील. त्यासाठी नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकांनी लवकर तोडगा काढावा अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

हेही वाचा - Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.