ETV Bharat / city

Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंह यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

author img

By

Published : Jun 17, 2022, 9:18 AM IST

Presidential Election 2022
Presidential Election 2022

18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक ( Presidential Election 2022 ) होणार आहे. त्यासाठी विरोधकांची नुकतीच एक बैठक 15 जुलैला दिल्लीत पार पडली. मात्र, भाजपकडूनही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्यावरून देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंह ( Rajnath Sing ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी फोन वरून सवांद साधला.

मुंबई - 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक ( Presidential Election 2022 ) होणार आहे. त्यासाठी विरोधकांची नुकतीच एक बैठक 15 जुलैला दिल्लीत पार पडली. मात्र, भाजपकडूनही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्यावरून देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंह ( Rajnath Sing ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी फोन वरून सवांद साधला. या सवांदात एनडीएच्या राष्ट्पती उमेदवारांबाबत चर्चा झाली पासून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने समर्थन द्यावे अशी मागणी केली असल्याची माहिती आहे.

18 जुलैला होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाची चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यानंतर राजनाथ सिंह यांनी शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्या सोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.

21 जूनला विरोधकांची दिल्लीत बैठक - राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा 21 जूनला विरोधी पक्षाची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 15 जूनला ही ममता बॅनर्जी यांच्या विनंतीनुसार अठरा विरोधी पक्षाचे नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवार, शिवसेनेकडून सुभाष देसाई नेते उपस्थित होते. त्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीचे विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला पसंती होती. मात्र आपण राष्ट्रपतीपदाची उमेदवारी होणार नाहीत हे पवार आणि आधीच स्पष्ट केले. त्या नंतर बैठकीत ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला आणि गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावाचाही प्रस्ताव मांडला. त्यामुळे 21 तारखेच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा- गडकरींचा नवा प्लॅन : चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार ५०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.