राज्यात पुणे, सांगली, सातारा, अहमदनगरमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण

author img

By

Published : Aug 4, 2021, 7:14 PM IST

corona
संग्रहित फोटो ()

कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी सक्रिय रुग्ण नंदुरबार व गडचिरोली येथे आहेत.

मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. फेब्रुवारीनंतर राज्यात दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटे दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांवर गेली होती. सध्या ही सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या खाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात कमी होत असताना सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी सक्रिय रुग्ण नंदुरबार व गडचिरोली येथे आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण या जिल्ह्यात -

हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र

राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या ६३ लाख २१ हजार ६८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६१ लाख १० हजार १२४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के इतके आहे. १ लाख ३३ हजार २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर २.११ टक्के आहे. राज्यात सध्या ७४ हजार ३१८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात ३ ऑगस्ट रोजी ७४ हजार ३१८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात १५ हजार ५५२, सांगलीत ७ हजार ३०१, सातारा येथे ६ हजार ८४८, अहमदनगर येथे ६ हजार ५७०, ठाणे येथे ५ हजार ९८२, कोहापूर येथे ५ हजर ४०४, मुंबईत ४ हजार ९९६, सोलापूर येथे ४ हजार ७७६ रुग्ण आहेत.

सर्वात कमी सक्रिय रुग्ण -

राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आहेत. नंदुरबारमध्ये केवळ ९ सक्रिय रुग्ण आहेत. गडचिरोली येथे २२ सक्रिय रुग्ण आहेत. हिंगोलीत ६४ सक्रिय रुग्ण आहेत. वाशिममध्ये ७७ सक्रिय रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात ९६ सक्रिय रुग्ण आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या होतेय कमी -

राज्यात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून राज्यात विषाणूची दुपारी लाट आली आहे. या लाटेदरम्यान मे महिन्यात ६ लाख ५० हजारच्या वर सक्रिय रुग्ण होते. जून महिन्यात ही सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर आली. जुलै महिन्यात त्यात आणखी घट होऊन १ लाखांच्या वर संख्या होती. ऑगस्ट महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७४ हजारावर आली आहे.

हेही वाचा - मुंबईत आता जिनोम सिक्वेन्सिंग लॅब; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.