ETV Bharat / city

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या - प्रवीण दरेकर

author img

By

Published : Nov 1, 2021, 3:12 PM IST

Updated : Nov 1, 2021, 4:56 PM IST

darekar
प्रवीण दरेकर

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी दरेकर यांनी केली आहे.

मुंबई - ड्रग पेडलरबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे संबंध असल्याचा फोटो अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे शेअर केला होता. या प्रकरणानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

हेही वाचा - सचिन वाझे आता मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या कस्टडीत, पोलीस वाझेला घेऊन तळोजावरुन निघाले

  • सीबीआय चौकशी करा - नवाब मलिक

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात दररोज नवनवीन आरोप होताना दिसत आहेत. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू असताना, आता या प्रकरणात भाजप नेत्यांचे संबंध उघडकीस आणण्याचे काम अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक करताना दिसत आहेत. आज त्यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग पेडलरबरोबर संबंध असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर हे फार मोठं रॅकेट असून, या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याबरोबरच यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे कशा पद्धतीचे संबंध आहेत हेसुद्धा तपासले पाहिजे आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीसुद्धा नवाब मलिक यांनी केली आहे.

  • गोपनीयतेच्या शपथेचा भंग -दरेकर

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी नवाब मलिक हे हेतुपूरस्पर आरोप करत आहेत. त्याचबरोबर नवाब मलिक यांनी मंत्रिपदी विराजमान होताना जी गोपनीयतेची शपथ घेतली होती त्याचा भंग केला आहे, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या जातीविषयी बोलण्याचा, तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे हे बोलून मलिक यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे, म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मलिक V/S फडणवीस : नवाब मलिकांचे चार महत्त्वाचे आरोप; फडणविसांनी दिले 'हे' उत्तर, वाचा...

Last Updated :Nov 1, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.