ETV Bharat / city

Prakash Ambedkar on Mahaparinirvan Diwas : आंबेडकरी अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊ नये - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Dec 2, 2021, 3:46 PM IST

Updated : Dec 2, 2021, 5:13 PM IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA Leader Prakash Ambedkar) यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Omicron Variant) आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर येणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Prakash Ambedkar Mahaparinirvana Day
Prakash Ambedkar Mahaparinirvana Day

मुंबई - राज्यात तसेच मुंबईत कोरोना विषाणूच असलेला प्रसार, जगभरात काही देशात आढळून आलेला ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे (Omicron Variant) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) ऑनलाईन अभिवादन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, या उलट भूमिका आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे (Jogendra kawade) यांनी घेतली होती. आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला (Chaityabhoomi) येतील, असा इशारा देण्यात आला होता. यानंतर महानगरपालिकेने चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे येण्यास आंबेडकरी जनेतला परवानगी असेल, असे आदेश काढले. मात्र, या संदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA Leader Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट बद्दल अंदाज कोणालाही आलेला नाही, अशा परिस्थितीत आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर येणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर -

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावे की नाही, अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंट (Omicron Variant) बद्दल अंदाज कोणालाही आलेला नाही, अशा परिस्थितीत आपण येणे टाळावे. आपण ज्या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

बाबासाहेबांना अभिवादन करता येणार -

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला येतील, असा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांची कशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल, यावर चर्चा झाली. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच दूरदर्शनवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

हेही वाचा - Mumbai Mayor On Chaityabhoomi : महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना दर्शन दिले जाईल

Last Updated :Dec 2, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.