ETV Bharat / city

प्रदीप शर्मांनी घेतली होती मनसुखच्या हत्येची सुपारी!

author img

By

Published : Sep 8, 2021, 7:16 PM IST

प्रदीप शर्माने संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का? असे विचारले होते. तेव्हा शेलारने हो म्हटले होते. ४ मार्च रोजी संध्याकाळी मानेने मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. यानंतर हिरेन त्याला भेटायला तयार झाला. मानेने मनसुखला शेलाकडे सोपवले.

प्रदीप शर्मा
प्रदीप शर्मा

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए करत होते. एनआयएने कोर्टामध्ये दहा हजार पानाचे आरोपपत्र सादर केला आहे. ही गाडी ज्याच्या मालकीची होती त्या मालकाचे नाव मनसुख हिरेन होते. आरोपत्रांमधून मनसुख हिरेन याला मारण्याचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. म्हणून मनसुखला मारण्याची सुपारी सचिन वाजे यांनी प्रदीप शर्मा यांना दिली होती. यासाठी प्रदीप शर्मांनी सचिन वाजे यांच्याकडून मोठी रक्कम देखील घेतली होती.

काय आहे प्रकरण?

मनसुख हिरेन यांची सुपारी मिळाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार यांना बोलावून घेतले आणि या संपूर्ण कटात सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनी मिळून मनसुख हिरेन यांची हत्या केली. मनसुख हिरेन यांची हत्या 4 मार्च रोजी झाली. मात्र या अगोदर सचिन वाझे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सुनील माने, सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे होते. या बैठकीत मनसुख हिरेन सुद्धा उपस्थित होता. बैठक बोलावण्याचा उद्देश एवढाच होता की, प्रदीप शर्मा तसेच सुनील माने यांना मनसुख हिरेन कसा दिसतो हे जाणून घ्यायचे होते.

आरोपत्रानुसार मनसुख हिरेनच्या हत्येचे काम प्रदीप शर्माला देण्यात आले होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. या कामासाठी प्रदीप शर्माने संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का? असे विचारले होते. तेव्हा शेलारने हो म्हटले होते. ४ मार्च रोजी संध्याकाळी मानेने मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. यानंतर हिरेन त्याला भेटायला तयार झाला. मानेने मनसुखला शेलाकडे सोपवले. शेलार मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह तवेरा गाडीत त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला गाडीमध्येच ठार केले आणि मृतदेह खाडीत फेकून दिला. आरोपपत्रात म्हटले आहे, की ३ मार्च रोजी वाझे पुन्हा एकदा शर्माला भेटले आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग दिली. ज्यात ५०० रुपयांच्या नोटा होत्या. पैसे घेतल्यानंतर प्रदीप शर्माने शेलारला फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्माला या वाहनाचा वापर करायचा होता.

हेही वाचा - धक्कादायक.. अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंगानी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.