ETV Bharat / city

msrtc strike परिवहन मंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा, पुढील निर्णय एसटी कर्मचारी घेतील - गोपीचंद पडळकर

author img

By

Published : Nov 13, 2021, 9:04 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने (msrtc employees delegation) परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा सकारात्मक झाली आहे. मात्र, पुढील निर्णय हा एसटी कर्मचारी घेतील, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

msrtc employees delegation meet anil parab
एसटी शिष्टमंडळ अनिल परब भेट सकारात्मक

मुंबई - गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (msrtc strike) सुरू असून गेल्या 4 दिवसांपासून कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. आज कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने (msrtc employees delegation) परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा सकारात्मक झाली आहे, मात्र पुढील निर्णय हा एसटी कर्मचारी घेतील, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

माहिती देताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर

हेही वाचा - Fadnavis on Tripura Violence : त्रिपुरात असे काही घडलेच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; फडणवीसांचा दावा

आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. कोर्टाने समितीला 12 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, यातील काही वेळ कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. वेळ कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. अजून संप मागे घेतलेला नाही. समितीचा अहवाल येत नाही तोवर सरकार काही करू शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने समिती नियुक्त केली आहे. कोर्टाच्या पुढे जाता येणार नाही, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. समितीचा अहवाल योग्य आला तर कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊ, निगेटिव्ह आला तर, शासनाच्या कर्मचाऱ्यांना जितका पगार मिळतो तितका पगार द्यायला सरकार सकारात्मक आहे, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. आंदोलनाला लोकप्रतिनिधी म्हणून आमचा पाठिंबा आहे. सर्व निर्णय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. कर्मचारी जे सांगतील त्याला आमचे समर्थन आहे, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

विलिनीकरणाची मागणी समोर ठेवली

कामगारांच्या अनेक व्यथा पहिल्यांदा समजल्या. विलिनीकरणाची मागणी मंत्री जाहीर करतील. समितीचा 12 आठवड्यांचा कालावधी कमी करण्याची मागणी मंत्र्यांही मान्य केली आहे. आम्ही हो बोललो नाही, संप चालूच आहे. आजही मुक्काम आझाद मैदानातच आहे. प्रत्येक विभागातील 5 तज्ज्ञ बसून विचार करतील मग उद्या सकाळी चर्चेला जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय घेऊ. कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

हेही वाचा - mumbai vaccination target : मुंबईत कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.