ETV Bharat / city

Minister Varsha Gaikwad Birthday Special : प्राध्यापिका ते महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाड यांचा प्रवास

author img

By

Published : Feb 3, 2022, 6:04 AM IST

Updated : Feb 3, 2022, 1:58 PM IST

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड. आज 3 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस. राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री असणाऱ्या वर्षा गायकवाड ( Woman Education Minister Varsha Gaikwad ) यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

मंत्री वर्षा गायकवाड
मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिला राजकारणींनी ( Women Politicians ) पैकी एक म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड. आज 3 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस. राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री असणाऱ्या वर्षा गायकवाड ( Woman Education Minister Varsha Gaikwad ) यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

  • असा आहे राजकीय प्रवास

महाराष्ट्रातील प्रख्यात राजकारणी एकनाथ गायकवाड यांच्या पोटी जन्मलेल्या वर्षा गायकवाड या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अध्यापक शिक्षणातही पदवी घेतली आहे. 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक लढवून आणि धारावी मतदारसंघातून निवडून येऊन त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2009 मध्ये पुन्हा आपल्या विजयाची पुनरावृत्ती केली आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्रालय सांभाळले. त्यांनी प्रथम संस्था आणि स्नेहा संस्थेसाठीही काम केले आहे. 2010 ते 2014 पर्यंत त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले. याचबरोबर त्यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणूनही काम केले. 2014 मध्येही त्या धारावी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या.

  • काँग्रेसच्या स्टार प्रचारक

काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे.

  • वर्षा गायकवाड यांचे शिक्षण

वर्षा गायकवाड यांनी बीएस्सी, झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर, मुंबई विद्यापीठ येथून केले आहेत. तर 1998 साली एमएस्सी इन मॅथेमॅटिक्स, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. 2001 साली बॅचलर ऑफ एज्युकेशन,( बी.एड) बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, मुंबई विद्यापीठमधून पूर्ण केले आहे.

  • स्वयंसेवी संस्थेत काम

वर्षा गायकवाड यांनी गणित या विषयात पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. बालपणापासूनच घरातून राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी प्रथम आणि स्नेहा या स्वयंसेवी संस्थेत काम करून समाजकारणाला सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांना यूएनडीपीने संयुक्त राष्ट्र राष्ट्र संमेलनात पाचारण करण्यात आले होते. एसजीबीटीआय समुदायाच्या प्रश्नावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

  • राजकीय कारकिर्द

2004 - 2009 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली टर्म)

2009 - 2014: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी टर्म)

2009 - 2010 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन, विशेष सहाय्य मंत्री

2010 - 2014 : महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार

2014 - 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (3री टर्म)

2019 पासून आत्तापर्यंत : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (4थे)

हेही वाचा - गोव्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Last Updated :Feb 3, 2022, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.