ETV Bharat / city

kirit Somaiya On Thackeray Government : 'आता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू'; सोमैयांचा ठाकरे सरकारला इशारा

author img

By

Published : Mar 24, 2022, 10:35 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh Case ) यांच्यावरील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. यावरुन किरीट सोमैयांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आता ठाकरे सरकाराची उलटी गिनती सुरु झाली आहे, असा इशारा सोमैयांनी दिला ( kirit Somaiya Warning Thackeray Government ) आहे.

kirit Somaiya
kirit Somaiya

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh Case ) यांच्यावरील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला आहे. त्यामुळे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला मोठा बसला आहे. दरम्यान, यावर आता भाजपा नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला फटका असल्याचे सोमैया यांनी म्हटलं ( kirit Somaiya Warning Thackeray Government ) आहे.



नेमकं काय म्हणाले सोमैया? - "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उद्धव ठाकरे सरकारच्या थोबाडीत मारण्याचे काम न्यायालयाने केले आहे. आता संजय राऊत यांचा उर्मटपणा आणि पोलिसांचा माफिया म्हणून होणारा वापर थांबणार आहे. ठाकरे सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे," असा इशाराही किरीट सोमैयांनी दिला आहे.

सोमैयांचा ठाकरे सरकारला इशारा



काय आहे न्यायालयाचा निर्णय? -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला आहे. परमबीर सिंहांच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 'प्रथम दृष्टया आमचे असे मत आहे की, काही प्रकरणांमध्ये सीबीआयने तपास करणे आवश्यक आहे. सत्य काय, दोष कोणाचा, अशी परिस्थिती कशी निर्माण झाली, याचा तपास व्हायला हवा. सीबीआयने या सर्व बाबींचा निःपक्षपातीपणे तपास करावा," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा - Amruta Fadnavis Criticized MVA : 'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण महाराष्ट्रात सुरू : अमृता फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.