Pankaja Munde : फडणवीसांशी 'पंगा' पंकजा मुंडेंना नडला..? राज्यसभेनंतर विधानपरिषदेचीही उमेदवारी नाहीच

author img

By

Published : Jun 8, 2022, 12:26 PM IST

Updated : Jun 8, 2022, 12:34 PM IST

pankaja munde

विधानपरिषदेसाठी भाजपने आज उमेदवारांची घोषणा ( BJP MLC Candidate List 2022 ) केली. या उमेदवारांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे ( BJP National Leader Pankaja Munde ) यांचे नाव घेण्यात आलेले नाही. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आंदोलनाला लोकल नेत्यांचे आंदोलन ( Devendra Fadnavis Aurangabad Agitation ) म्हणून केलेला उल्लेख पंकजा मुंडे यांना नडला तर नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

मुंबई : भाजपने आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर ( BJP MLC Candidate List 2022 ) केली. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे ( BJP National Leader Pankaja Munde ) यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मध्यंतरी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केलेल्या आंदोलनाला लोकल नेत्यांचे आंदोलन ( Devendra Fadnavis Aurangabad Agitation ) म्हणून मुंडे यांनी उल्लेख केला होता. याच कारणामुळे पंकजा मुंडे यांची उमेदवारी डावलण्यात आली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

भाजपकडून आज पाच नेत्यांची नावे विधानपरिषदेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मंत्री राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांचा समावेश आहे. या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती. मात्र यादीत नाव नसल्याने आता पंकजा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे : औरंगाबाद येथे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, 'जलआक्रोश मोर्चा हा लोकल लोकांनी काढला होता, मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर नक्की सहभागी झाले असते. परंतु, मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यामुळे लोकल मोर्चात सहभागी व्हावेच असे नाही'. मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचीही मागणी होत होती. मात्र राज्यसभेनंतर विधानपरिषदेलाही डावलण्यात आल्याने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : Jal Akrosh Morcha: मी राष्ट्रीय नेता आसल्याने, जलआक्रोश मोर्चात उपस्थित नाही -पंकजा मुंडे

Last Updated :Jun 8, 2022, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.