ETV Bharat / city

MH Monsoon Session 2022 पंन्नास खोके...एकदम ओके, विरोधकांची घोषणाबाजी

author img

By

Published : Aug 18, 2022, 3:20 PM IST

पंन्नास खोके...एकदम ओके, विरोधकांच्या घोषणाबाजी
पंन्नास खोके...एकदम ओके, विरोधकांच्या घोषणाबाजी

राज्य विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी बंडखोर शिंदे गटाविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी बंडखोर शिंदे गटावर 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा देवून दिवस गाजवला. MH Monsoon Session 2022 आज गुरुवार (दि. 18 ऑगस्ट)रोजी दुसऱ्या दिवशी शेतकरी, कायदा सुव्यवस्था आदी मुद्द्यांना प्राधान्य दिले. तसेच गद्दारांना भाजपची वाटी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी, फिट्टी फिट्टी, चलो गुवाहाटी या नव्या घोषणेतून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली. विरोधकांचे पायऱ्यांवरील आंदोलन लक्षवेधी ठरले.

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांंडत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. Maharashtra Monsoon Session शेतकरी, कायदा सुव्यवस्था बरोबरच विरोधकांच्या निशाण्यावर होता, Shinde government शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. 39 आमदारांना फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले. दरम्यान, आमदारांना 50 कोटी रुपये दिल्याची जोरदार चर्चा रंगली. विरोधकांनी हाच धागा पकडून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

पूरस्थिती भागातील शेतकऱ्यांना सरकारची मदत अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त केला. बंडखोर शिंदे गटावरही गद्दारांना भाजपची वाटी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी, फिट्टी फिट्टी चलो गुवाहाटी अशा घोषणा दिल्या. तसेच दादागिरी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, ईडी सरकार हाय हाय, लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आदी घोषणा देण्यात आल्या. अतिवृष्टी, पूरस्थिती भागातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळायला हवी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गद्दार पडले, गद्दार पळाले - सकाळच्या सत्रातील विधीमंडळाच्या कामकाजाला आलेल्या बंडखोर शिंदे गटाचे आमदारांची महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी टर उडवली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ, संजय गायकवाड, संदीपान भूमरे, गुलाबराव पाटील आदी नेते विधिमंडळात आले असता, गद्दार आले, गद्दार आले अशी घोषणा विरोधकांनी दिली. तर पायऱ्यांवरील आंदोलन पाहून मुख्यमंत्री गेटकडून सभागृह गाठणाऱ्या आमदारांना गद्दार पळाले, अशी जोरदार खिल्ली उडवली. तर यामिनी जाधव यांच्या प्रवेशावेळी ईडी, ईडीचे सूर लावून धरले.

हेही वाचा - Maharashtra Monsoon Session मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.