ETV Bharat / city

इकबाल मिर्ची प्रकरणात महिला हवाला ऑपरेटरला अटक

author img

By

Published : Oct 22, 2019, 10:44 PM IST

इकबाल मिर्ची प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक

वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीकडून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडेला अटक कण्यात आली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार रिंकु देशपांडे यांचे इकबाल मिर्चीशी सोबत संबध होते.

मुंबई - वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडी कडून या आगोदर अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाणीवरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

इकबाल मिर्ची प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक

मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायून मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडीने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अटक महिला आरोपी रिंकू देशपांडे व तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्ची सोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा याला 40 कोटी रुपयांची दलाली मिळवून देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आले होते. अटक आरोपी रणजित बिंद्रा याने ईडी चौकशीत कबुली दिली आहे, की 3 जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडनमध्ये भेटला होता. यासाठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याचे ईडी चौकशीत रंजित बिंद्रा याने म्हटले आहे.

Intro:मुंबईतील वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडी कडून या आगोदर अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाणीवरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Body:मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायून मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडी ने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे. ईडी च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अटक महिला आरोपी रिंकू देशपांडे व तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्ची सोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा यास 40 कोटी रुपयांची दलाली मिळऊन देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आले होते. अटक आरोपी रणजित बिंद्रा याने ईडी चौकशीत कबुली डोकी आहे की 3 जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडन मध्ये भेटला होता.या साठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याचे ईडी चौकशीत रंजित बिंद्रा याने म्हटले आहे.




Conclusion:दरम्यान , इक्बाल मिर्चीचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा हुमायून मर्चंट ला मंगळवारी ईडी कडून अटक केल्यानंतर ईडी न्यायालयात हजर केले असता त्यास 24 ऑक्‍टोबर पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे .

वरळीतील राबिया मेंशन ही इमारत इक्बाल मिर्चीचा संबंधित कंपनीला विकण्यासाठी हुमायून मर्चंट याने महत्वाची भूमिका बजावली होती. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय मंत्री पदावर असताना मुंबईतील वरळी येथील सिजे इमारतीच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल व मर्चंट यांची भेट झाल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करणे बाकी असल्याचे कारण देत ईडी कडून हुमायून मर्चंट याची ईडी कोठडी मागण्यात आली होती . त्याला अनुसरून न्यायालयाने 24 ऑक्‍टोबरपर्यंत ह्यूमन मर्चंट याला ईडी कोठडी सुनावली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.