Nitin Deshmukh Photo VIRAL : नितीन देशमुखांना आम्ही विमानाने घरी पाठवलं, शिंदे गटाचा दावा; तर देशमुखांचे विमानातले फोटो VIRAL

author img

By

Published : Jun 23, 2022, 3:40 PM IST

Nitin Deshmukh Photo VIRAL

नितीन देशमुखांनी काल पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर गंभीर आरोप केले. त्यांना बळजबरीने गुरजातमध्ये नेल्याचे ते म्हणाले होते. मात्र, देशमुखांच्या या आरोपानंतर आता शिंदे गटाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. देशमुख यांना कोणतीही मारहाण केली असून आम्ही त्यांना विमानाने महाराष्ट्रात पाठवल्याचे म्हटले आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर गंभीर आरोप केले. त्यांना बळजबरीने गुरजातमध्ये नेल्याचे ते म्हणाले होते. मात्र, देशमुखांच्या या आरोपानंतर आता शिंदे गटाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. देशमुख यांना कोणतीही मारहाण केली असून आम्ही त्यांना विमानाने महाराष्ट्रात पाठवल्याचे म्हटले आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नितीन राऊतांनी केले होते आरोप - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला काहीही झालेले नाही. मी त्या हॉटेलमधून रात्री तीन वाजता निघालो होते. त्यावेळी शेकडोच्या संख्येने गुजरात पोलीस आले व मला जबरदस्ती उलचून सुमारे 25 दवाखाने फिरवले. जबरदस्तीने माझ्या दंडात इंजेक्शन देण्यात आले व मला हृदयविकाराचा झटका आला, अशी अफवा पसरवली. मी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे. पण मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. आमच्या मंत्र्यांसोबत मी सुरतला गेलो होतो असेही ते, म्हणाले. रात्री तीन वाजता हॉटेलमधून निघालो पोलीस माझ्या मागे होते. शंभर ते दीडशे पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये भरती केले. बाकी आमदारांची काय परिस्थिती आहे असे, विचारल्यावर सगळे व्यवस्थित होईल, असेही देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

हेही वाचा - Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.