ETV Bharat / city

Nitesh Rane Tweet : नारायण राणेंना मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिली होती सुपारी : नितेश राणेंचे ट्विट

author img

By

Published : Jul 23, 2022, 10:58 AM IST

BJP MLA Nitesh Rane
भाजप आमदार नितेश राणे

भाजप आमदार तथा नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, माझे वडील नारायण राणेंनी ( Union Minister Narayan Rane ) शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मारण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप ( Sensational Allegation ) नितेश राणेंनी केला आहे. तसेच, आदित्य यांची म्याॅंव म्याॅंव संपू दे, मग त्यांचे वस्त्रहरण करू, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

मुंबई : भाजप आमदार तसेच नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांचे पुत्र नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी उद्धव ठाकरे ( Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये अत्यंत टोकाचे वाद झाले होते. त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला ( Shiv Sena Youth Leader Aditya Thackera ) आहे. ट्विटरच्या माध्यमातून ( Nitesh Rane Tweets ) त्यांनी हा आरोप केला ( Sensational Allegation ) असून, त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणेंचे ट्विट : भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले की, माझे वडील नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा शांत आणि सोबर चेहरा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. पण, तो खरा नाही. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. तसेच, पुढे अजूनही त्यांचे वस्त्रहरण करू, असा इशाराही नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसेच, आदित्य यांच्यावर निशाणा ( Nitesh Rane Targets Aditya Thackeray ) साधत, त्यांची म्याॅंव म्याॅंव संपू दे, नंतर मी यांचे आणखी किस्से बाहेर काढून, वस्त्रहरण करीत राहणार. नितेश राणेंच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nitesh Rane tweets
नितेश राणे ट्विट

एकनाथ शिंदेंना नाकारली होती सुरक्षा : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालीन गडचिरोलीचे पालकमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही त्यांच्या सुरक्षेत वाढ नाकारली होती, असा आरोप एकनाथ शिंदे गटाकडून केला जातोय. त्यानंतर आता नितेश राणे यांच्याकडून थेट नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांनी मारण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केला गेला आहे.


नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना धमकीचे पत्र : गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे केली. ही कामे होऊ नयेत यासाठी त्या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच नक्षलवादी गटाने एकत्रितरीत्या एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठीचे धमकीचे पत्र पाठवले होते. अशी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची सुरक्षा नाकारली असल्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेतून म्हटले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी थेट नारायण राणे यांची सुपारी उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.