ETV Bharat / city

After Sanjay Raut Arrested : राऊतांच्या अटकेनंतर नवा ट्विस्ट; दहा लाख नोटांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव

author img

By

Published : Aug 1, 2022, 11:39 AM IST

पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या घरी ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ( 11 lakh 50 Thousand Cash Found ) सापडली. त्यापैकी १० लाख नोटांच्या बंडलवर सेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव ( CM Eknath Shinde Name on Cash of 10 Lakhs ) असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेला नवा ट्विस्ट आला आहे.

Sanjay Raut and Eknath Shinde
संजय राऊत व एकनाथ शिंदे

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केलेल्या शिवसेनेच्या फायरब्रँड संजय राऊत यांच्या घरी ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ( 11 lakh 50 Thousand Cash Found ) सापडली. त्यापैकी १० लाख नोटांच्या बंडलवर सेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचे समोर ( CM Eknath Shinde Name on Cash of 10 Lakhs ) आले आहे. या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, ( CM Eknath Shinde Name on Cash of 10 Lakhs ) ही चौकशी आता वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता आहे.



१० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव : पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने रविवारी सकाळी सात वाजता धडक कारवाईला सुरुवात केली. नऊ तासानंतर राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणले. त्यानंतर राऊत यांना अटक केली. ईडीने दिवसभर केलेल्या झाडाझडतीत सुमारे ११ लाख ५० हजारांची रोख रक्कम सापडली. त्यापैकी १० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी याबाबत खुलासा केला.

खोटी कागदपत्रे दाखवून केली अटक : संजय राऊत यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे तयार करून अटक दाखवली आहे. भाजप हे संजय राऊत यांना घाबरते. त्यामुळे राऊत यांना अटक करायला लावली. मात्र, संजय राऊत घाबरणार नाहीत, झुकणार नाहीत आणि कितीही दबाव टाकला तरी शिवसेना सोडणार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतील, असे सुनील राऊत यांनी सांगितले.

सापडलेली रोख रक्कम अयोध्या दौऱ्यासाठी गेलेल्या आमदारांसाठी : संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई केली. मात्र अशा कारवाईने त्यांचा आवाज दबला जाणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक आवाज उठवेल आणि संजय राऊत आणि शिवसेनेला न्याय देईल, असे राऊत यांनी म्हणाले. ईडीने केलेल्या तपासणी वेळी सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांची रोख सापडली. मात्र, जे पैसे सापडले ते अयोध्या दौऱ्यासाठी गेलेल्या आमदारांसाठी होते. आमदार सुनील राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे एकनाथ शिंदेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.



खोटे पुरावे देऊन ईडीने केली कारवाई : ईडीच्या कारवाईला घाबरणार नाही, त्यांच्या दबावापुढे झुकणार नाही आणि घाबरून शिवसेनाही सोडणार नाही, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच ईडीने माझ्या विरोधात खोटे तर पुरावे तयार करून कटकारस्थान रचून कारवाई केली आहे. ती कारवाई खोटी असल्याचाही राऊत म्हणाले होते.



शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती टीका : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे आले. हे काय चालले आहे, हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणे चालले आहे की लाज लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, अशी खरमरीत टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. या जुलूमशाही विरोधात आपण लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे.


हेही वाचा : Aslam Sheikh Met Deputy CM Devendra Fadnavis : काँग्रेस नेते अस्लम शेख-देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.