ETV Bharat / city

नवीन शिक्षण नीती केवळ दस्तावेज नाही भविष्याचा वेध घेणारी रचना, शिक्षक दिनाच्या निमित्ताने अमित शाह यांची स्पष्टोक्ती

author img

By

Published : Sep 5, 2022, 8:00 PM IST

नवीन शिक्षण नीती केवळ दस्तावेज नाही भविष्याचा वेध घेणारी रचना
नवीन शिक्षण नीती केवळ दस्तावेज नाही भविष्याचा वेध घेणारी रचना

नवीन शिक्षण नीती केवळ दस्तावेज नाही भविष्याचा वेध घेणारी रचना असे अमित शाह यांनी म्हटले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अमित शाह यांची स्पष्टोक्ती महत्वपूर्ण आहे.

मुंबई - 'नवीन शिक्षण नीती केवळ दस्तावेज नाही भविष्याचा वेध घेणारी रचना आहे. यामुळे विद्यार्थी केवळ डिग्री घेणारा नाही बनणार. तर देश आणि समाजाच्या भल्यासाठी विकास करणारे विद्यार्थी तयार होतील. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विचार आजही काल सुसंगत आहे. त्यांच्या मार्गावर आपण सर्वांनी चालायला हवे.' असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने केले. ते पवई मुंबईतील ए. एम. नाईक या नवीन शाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,ए एम नाईक तसेच लार्सन अँड टूब्रो कंपनीचे संचालक एस एन सुब्रमण्यम यांची देखील उपस्थित होती.

शिक्षण व्यवस्थेबद्दल भाष्य - देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल भाष्य केले . 'नवीन शिक्षण धोरण हा केवळ नीतिगत दस्तावेज नाही. भारताची मूळ शिक्षण परंपरेचा सुगंध देणारा दस्तावेज आहे.' अशी त्यांनी नवीन शिक्षण नीतीची महती सांगितली. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाईक शाळेच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले,' शिक्षक दिनाच्या निमित्ताने अभिनंदन अभिनंदन करतो. ए एम नाईक यांनी देशांमध्ये तंत्रज्ञान पसरविण्यात प्रमुख भूमिका निभावली. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात त्यांनी विपुल योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी समाज उपयोगी अनेक व्यवस्था उभ्या केल्या."असे म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

शिक्षक हा देशाचे भविष्य - ए एम नाईक शाळेचे प्रमुख आणि संस्थापक स्वतः ए एम नाईक म्हणाले, 'शिक्षक हा देशाचे भविष्य घडवणारा समाजाचे परिवर्तन घडवणारा असल्याने आजच्या काळात झाला आधुनिक शिक्षणासह भारताच्या परंपरेचेही जोड मिळाली पाहिजे.' या हेतूने ही शिक्षण संस्था सुरू केल्याचा त्यांनी सांगितलं.

नाट्यमय सत्तांतरानंतर अमित शहांचा पहिलाचं दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुंबईत जरी आले असले तरी त्यांनी मुख्य म्हणजे भाजप कार्यकर्ते, माजी नगरसेवक, आमदार व नेत्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या शेजारी असलेल्या मेघदूत या बंगल्यात संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक होती. कारण राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे - फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा होता. याप्रसंगी बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती तोडली असं सांगत शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली असल्यासही ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेची अवस्था आता खयाली पुलावाप्रमाणे (ShivSena Condition Is like Khyali Pulao) झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं असून आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही तर त्यांची वाहतात त्यांनी स्वतःच लावली आहे असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून पेच, मुंबई महापालिकेची डोकेदुखी वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.