ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी १३५ नवे रुग्ण, २ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 22, 2022, 6:32 PM IST

आज (मंगळवारी) त्यात किंचित वाढ होऊन १३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १३१५ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. काल सोमवारी त्यात घट होऊन ९६ रुग्णांची नोंद झाली. आज (मंगळवारी) त्यात किंचित वाढ होऊन १३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १३१५ सक्रिय रुग्ण आहेत.

  • १३५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२२ फेब्रुवारीला) १३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार ७९५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३४ हजार ९१४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३१५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३५१२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.

  • ९७.९ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या १३५ रुग्णांपैकी ११५ म्हणजेच ८५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,२४८ बेडस असून त्यापैकी ७८१ बेडवर म्हणजेच २.१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.९ टक्के बेड रिक्त आहेत.

  • १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर आज रविवारी २० फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

  • धारावीत शून्य रुग्णांची नोंद

धारावीत आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६४३ रुग्णांची नोंद झाली असून ८२१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या ५ सक्रिय रुग्ण आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी; मृणाल ढोले पाटील-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.