ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत ८९ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : Feb 26, 2022, 7:19 PM IST

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत आज (२६ फेब्रुवारीला) ८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( 200 corona patients discharged ) आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार २९६ रुग्णांची नोंद झाली ( corona cases in Mumbai ) आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार ८२६ रुग्ण बरे झाले ( corona patient recovery rate in Mumbai ) आहेत

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शनिवारी ८९ कोरोना रुग्णांची नोंद ( 89 new corona cases ) झाली होती. आज शून्य मृत्यूची नोंद झाली ( zero corona deaths in Mumbai ) आहे. आजतागायत एकूण १६ वेळा तर फेब्रुवारी महिन्यात सात वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

नव्या ८९ कोरोना रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (२६ फेब्रुवारीला) ८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( 200 corona patients discharged ) आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार २९६ रुग्णांची नोंद झाली ( corona cases in Mumbai ) आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार ८२६ रुग्ण बरे झाले ( corona patient recovery rate in Mumbai ) आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९०२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४४५० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.

हेही वाचा-Indians Arriving Mumbai From Ukraine : विशेष विमानाचे रोमानियातून उड्डाण, मुंबई विमानतळावर विशेष कॉरिडॉर, प्रवाशांची कोव्हिड टेस्ट

९८ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ८९ रुग्णांपैकी ६९ म्हणजेच ७८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५,९८७ बेड्स असून त्यापैकी ७२० बेडवर म्हणजेच २ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९८ टक्के बेड रिक्त आहेत.

हेही वाचा-Bacchu Kadu Inquiry : महाविकास आघाडीचा आणखी एक मंत्री चौकशीच्या भोवऱ्यात; राज्यपालांनी दिले आदेश

१६ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारीला, २६ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा-Lavasa Project : शरद पवार, सुप्रिया सुळेंना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय - मुंबई उच्च न्यायालय

धारावीत ३ सक्रिय रुग्ण -
धारावीत आज १ रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सलग ३ दिवस शून्य रुग्णांची नोंद झाली होती. धारावीत आतापर्यंत एकूण ८६४५ रुग्णांची नोंद झाली आहे. ८२२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

तिसरी लाट संपण्याच्या दिशेने...

गेली दोन वर्षे मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.