ETV Bharat / city

MH Corona Update : राज्यात कोरोनाचे आढळले 675 रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 1, 2022, 9:13 PM IST

राज्यात आज 675 कोरोना बाधितांच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी 407 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज कोरोना संक्रमण बाधित दोनशे रुग्णांची वाढ झाली आहे. मृतांची टक्केवारी मात्र 1.82 टक्के इतकी स्थिर ( Corona patient death rate ) आहे. दिवसभरात 1225 रुग्ण बरे झाले ( corona recovery in Maharashtra आहेत.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोना आटोक्यात आला असताना आज किंचित रुग्णसंख्येत वाढ झाली ( Maharashtra corona update ) आहे. दिवसभरात 675 बाधित ( new 675 corona cases in MH ) आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू ( 5 corona patient deaths in MH ) झाला. तर दुसरीकडे 104 जणांना ओमयक्रोनची बाधा झाली आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.


राज्यात आज 675 कोरोना बाधितांच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी 407 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज कोरोना संक्रमण बाधित दोनशे रुग्णांची वाढ झाली आहे. मृतांची टक्केवारी मात्र 1.82 टक्के इतकी स्थिर ( Corona patient death rate ) आहे. दिवसभरात 1225 रुग्ण बरे झाले ( corona recovery in Maharashtra ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.4 टक्के आहे. आजपर्यंत 77 लाख 12 हजार 568 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा-Russia-Ukraine Crisis : रशियाने व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा युक्रेनचा आरोप

कोरोनाचे 6 हजार 103 सक्रिय रुग्ण
कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 79 लाख 40 हजार 925 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.9 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 66 हजार 380 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 31 हजार 412 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 663 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाचे 6 हजार 103 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा-अँटिलिया स्फोटक प्रकरण: मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आरोपी रियाज काझीचा जामीन अर्ज

ओमायक्रोनचे शून्य रुग्ण
ओमयक्रोनचे सलग तीन दिवस एकही एक रुग्ण सापडला नव्हता. परंतु, आज 104 जणांना संसर्ग झाला आहे. पुणे मनपा हद्दीत 41, औरंगाबाद 14, सिंधुदुर्ग 10, मुंबई 11, जालना आणि नवी मुंबई 8, ठाणे मनपा 5, मीरा भाईंदर 3 आणि साताऱ्यात 2 रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत 4 हजार 733 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 4509 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9382 जणांची जनुकीय चाचणी केली. 8407 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले आहे. तर 975 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा-Nawab Malik Case : नवाब मलिकांच्या ईडीच्या कारवाई विरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी


विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 77
ठाणे - 6
ठाणे मनपा - 13
नवी मुंबई पालिका - 8
कल्याण डोबिवली पालिका - 5
मीरा भाईंदर - 2
वसई विरार पालिका - 0
नाशिक - 46
नाशिक पालिका - 11
अहमदनगर - 54
अहमदनगर पालिका - 13
पुणे - 96
पुणे पालिका - 128
पिंपरी चिंचवड पालिका - 40
सातारा - 15
नागपूर मनपा - 24

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.