ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत ३५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ५ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 7, 2022, 8:21 PM IST

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. ( Coronas Third Wave in Mumbai ) जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. शनिवारी ६४३, रविवारी ५३६ रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के ( Corona recovery rate in Mumbai ) आहे.

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट मुंबईत ओसरत असल्याचे चित्र आहे. मुंबईत ३५६ नव्या कोरोना रुग्णांची ( New 356 corona cases in Mumbai ) नोंद झाली आहे. तर कोरोनाने आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. ( Coronas Third Wave in Mumbai ) जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. शनिवारी ६४३, रविवारी ५३६ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन ३५६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के ( Corona recovery rate in Mumbai ) आहे. तर ५१३९ सक्रिय रुग्ण आहेत. ( Mumbai Corona Update on 7th Feb 2022 )

हेही वाचा-PM Modi Criticizes Cong : पंतप्रधानांची कॉंग्रेसवर टीका, म्हणाले- मुंबईतील कोरोना बिहार-उत्तर प्रदेशात पसरवला

३५६ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (७ फेब्रुवारीला) ३५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ९४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५१ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २७ हजार ०९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५१३९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७६० दिवस इतका आहे. मुंबईमधील केवळ १ इमारत सील आहेत. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे.

हेही वाचा-Nitesh Rane in Kolhapur : वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल

९४.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ३५६ रुग्णांपैकी ३१३ म्हणजेच ८८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,११६ बेडस असून त्यापैकी १४०७ बेडवर म्हणजेच ३.८ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९६.२ टक्के बेड रिक्त आहेत.

हेही वाचा-Shah Rukh Khan : शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर मागितली दुआ, तर्कवितर्कांना उधाण

रुग्णसंख्येत घट-
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६, ७ फेब्रुबारीला ३५६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.