ETV Bharat / city

Maharashtra Corona Update :राज्यात कोरोनाचे आढळले 1 हजार रुग्ण; पुण्यात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण

author img

By

Published : Feb 24, 2022, 8:26 PM IST

राज्यात सक्रिय रुग्ण 10 हजार इतके ( corona active cases in MH ) आहेत. तर 2 हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे दिलासा मिळाला असताना आज ओमायक्रोनचे 58 रुग्ण आढळून ( Omicron cases in Maharashtra ) आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे भागातील आहेत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोना उतरणीला लागला आहे. आज दिवसभरात केवळ 1 हजार 182 बाधितांची नोंद ( corona cases in Maharashtra ) झाली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात सक्रिय रुग्ण 10 हजार इतके ( corona active cases in MH ) आहेत. तर 2 हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे दिलासा मिळाला असताना आज ओमायक्रोनचे 58 रुग्ण आढळून ( Omicron cases in Maharashtra ) आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे भागातील आहेत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

हेही वाचा-नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही! - भाजप नेते चंद्रकांत पाटील

राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सक्रिय, क्वॉरंटाईन आणि बाधित रुग्णदेखील रुग्ण घटत आहेत. आज 1 हजार 182 रुग्णांची नोंद झाली. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची टक्केवारी 1.82 टक्के इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहेत. आज 2 हजार 516 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 4 हजार 733 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा-Mahavikas Aghadi Protest : केंद्र सरकार आणि ईडीविरोधात आंदोलन; काँग्रेस, राष्ट्रवादीचे डझनभर तर सेनेचा एकच मंत्री सहभागी

कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 75 लाख 74 हजार 774 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10.14 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 62 हजार 650 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 801 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 10 हजार 250 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


हेही वाचा-Openly Drug Use In Local : लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

ओमायक्रोन 58 रुग्ण
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रोनचे आज 58 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पुणे मनपा हद्दीत 52, पुणे ग्रामीण भागात 3 आणि उर्वरित तीन रुग्ण अहमदनगर, सातारा व पिंपरी चिंचवड भागातील प्रत्येकी 1 इतके आहेत. आजपर्यंत 4 हजार 567 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 4456 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8904 जणांची जनुकीय चाचणी केली आहेत. 8,133 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 771 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.


विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 119
ठाणे - 9
ठाणे मनपा - 12
नवी मुंबई पालिका - 19
कल्याण डोबिवली पालिका - 6
मीरा भाईंदर - 7
वसई विरार पालिक - 1
नाशिक - 35
नाशिक पालिका - 12
अहमदनगर - 125
अहमदनगर पालिका - 11
पुणे - 93
पुणे पालिका - 219
पिंपरी चिंचवड पालिका - 49
सातारा - 22
नागपूर मनपा - 41

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.