ETV Bharat / city

NCP Janta Darbar : कोरोनामुळे बंद असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जनता दरबार 'या' तारखेपासून पुन्हा सुरू होणार

author img

By

Published : Mar 31, 2022, 5:31 PM IST

कोरोना संक्रमणामुळे स्थगित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा जनता दरबार ( NCP Janta Darbar ) आता ४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या आदेशानुसार पक्षाने जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला होता. मात्र, कोरोनाचे सावट आल्यापासून सुरक्षेच्यादृष्टीने हा उपक्रम काही काळ बंद ( NCP Janta Darbar Closed Due To Corona ) ठेवण्यात आला होता.

NCP Janta Darbar
NCP Janta Darbar

मुंबई - कोरोना संक्रमणामुळे स्थगित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा जनता दरबार ( NCP Janta Darbar ) आता ४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या आदेशानुसार पक्षाने जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला होता. मात्र, कोरोनाचे सावट आल्यापासून सुरक्षेच्यादृष्टीने हा उपक्रम काही काळ बंद ( NCP Janta Darbar Closed Due To Corona ) ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा जनता दरबार सुरू करण्यात येणार आहे. मुंबई प्रदेश कार्यालयात दिलेल्या वेळ आणि तारखेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

NCP Janta Darbar
राष्ट्रवादी काँग्रेसचे परिपत्रक

जनता दरबार पुन्हा भरणार - राज्यात कोरोना संक्रमण आटोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यात 1 एप्रिलपासून नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. या नियमांच्या शिथिलतेमुळे आता राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे जनता दरबारचा उपक्रम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार या काळात पक्षाचे मंत्री जनतेच्या तसेच कार्यकर्त्यांच्या कामांसाठी उपस्थित राहतील राहणार आहेत.

हेही वाचा- Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.