ETV Bharat / city

Sharad Pawar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना भाजपाची फूस! गुजरात आणि आसाममध्ये सत्ता कोणाची? - शरद पवार

author img

By

Published : Jun 23, 2022, 10:48 PM IST

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाच्या मागे भारतीय जनता पक्षाचे फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केला आहे. गुजरात आणि आसाममध्ये कोणाची सत्ता आहे? असा प्रश्न उपस्थित करून एकनाथ शिंदे जे करत आहेत, यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा दाखला शरद पवार यांनी दिला. ( Sharad Pawar On Eknath Shinde )

Sharad Pawar On Eknath Shinde
शरद पवारांनी केले आरोप

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाच्या मागे भारतीय जनता पक्षाचे फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केला आहे. गुजरात आणि आसाममध्ये कोणाची सत्ता आहे? असा प्रश्न उपस्थित करून एकनाथ शिंदे जे करत आहेत, यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा दाखला शरद पवार यांनी दिला. गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या परिचयाचे आहेत. ते नेते बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

बंडामागे भाजपा - महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार खासदारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर हे आरोप केले आहेत. तसेच हे सर्व बंद करत असताना एकनाथ शिंदे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता देशातील सर्व राष्ट्रीय पक्षांची नावे घेत, यापैकी एकनाथ शिंदे यांना कोण पाठिंबा देत असेल हे सांगावे लागणार नाही असा मुद्दा देखील त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या बंडाच्या मागे भारतीय जनता पक्ष नाही असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावला होता. मात्र अजित पवार यांना राज्यातली जास्त माहिती आहे. मात्र आपल्याला गुजरात आणि आसाम मधली परिस्थिती अधिक माहिती म्हणतात यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा शरद पवार यांनी सांगितले.

बंडखोर आमदारांना मुंबईत यावे लागेल - शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाघाटी बसून आरोप करत आहेत. तसेच शिवसेनेने महाविकास आघाडी तून बाहेर पडण्याची मागणी करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवसेनेच्या बंड पुकारलेल्या आमदारांना शेवटी मुंबईतच यावं लागेल. विधानसभेच्या रणांगणात या सर्व आमदारांना उतरावं लागेल. इथे आल्यानंतर त्या आमदारांना गुजरात व आसामचे नेते मार्गदर्शन करणार नाहीत, असा चिमटाही शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.

निधीचा मुद्दा लक्ष हटवण्यासाठी - नाराज आमदारांकडून निधीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप केला जातोय. मात्र हा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते निवडून येत नाहीत. म्हणून आपल्या मतदार संघात गेल्यावर आपली परिस्थिती तशी व्हायला नको. म्हणून आमदार निधीचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच या आमदारांनी केलेले कृत्य पक्षांतर बंदी कायद्याविरोधात असल्या तरी शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Sharad Pawar PC : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात, शरद पवारांचा आरोप

हेही वाचा - Eknath Shinde : जे काही सुखदुख आहे ते आपल्या सगळ्यांचे एक; बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना केला आपला नेता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.