ETV Bharat / city

Sameer Wankhede Transferred : अखेर समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली

author img

By

Published : Jan 3, 2022, 2:52 PM IST

Updated : Jan 3, 2022, 3:33 PM IST

समीर वानखेडे
समीर वानखेडे

मुंबई - एनसीबीचे ( NCB Zonal Director ) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( Sameer Wankhede Transferred ) यांची महसूल गुप्तचर संचालनालय ( Directorate of Revenue Intelligence ) येथे बदली झाली आहे. वानखेडे एनसीबीत येण्यापूर्वी डीआरआयमध्येच कार्यरत होते.

मुंबई - एनसीबीचे विभागीय संचालक ( NCB Zonal Director ) समीर वानखेडे ( Sameer Wankhede Transferred ) यांची महसूल गुप्तचर संचालनालय ( Directorate of Revenue Intelligence ) येथे बदली झाली आहे. वानखेडे यांचा 31 डिसेंबर रोजी एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. मात्र, पदमुक्ततेची सूचना आली नव्ही. सोमवारी (दि. 3 जानेवारी) वानखेडे यांची बदली डीआरआयमध्ये करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. वानखेडे एनसीबीमध्ये येण्यापूर्वी डीआरआयमध्येच कार्यरत होते.

समीर वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या ( Cruise Drug Case ) तपासाचे नेतृत्त्व केल्याने ते चर्चेत आले. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik on Sameer Wankhede ) यांनी विविध आरोप लावले होते. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याकडून तपास करत असलेल्या पाच प्रकरणाचा तपासही काढून घेण्यात आला होता.

मागील काही महिने समीर वानखेडे यांच्या विरोधात वाद सुरू आहेत. त्यामुळे या पदावर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर ड्रग सिंडीकेट विरुद्ध सुरू झालेल्या कारवाईत वानखेडे सामील होते. या सिंडीकेटमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार सामील असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ऑक्टोबरमध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई किनाऱ्यावर एका क्रुझवर घातलेल्या धाडीत मादक पदार्थ मिळाले होते. त्यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरुख यांचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते.

कोण आहेत समीर वानखेडे..?

समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील ( IRS ) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्यापूर्वी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये ( Central Police Organization ) रुजू झाले होते. सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग ( Central Intelligence Agency ), सीबीआय ( Central Bureau of Investigation ), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो ( National Crime Records Bureau ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक ( National Disaster Response Force ), केंद्रीय तपास यंत्रणा ( National Investigation Agency ) यांसारखे विविध विभाग येतात. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ( UPSC Exam ) पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले. भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षे काम केले.

कोणकोणत्या पदांवर वानखेडे यांनी केले काम

2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट ( Air Intelligence Unit ) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ( National Investigation Agency ) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे ( Directorate of Revenue Intelligence ) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( Narcotics Control Bureau ) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली

2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला ( Mika Singh ) परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषकही ( 2011 World Cup Final ) कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

हेही वाचा - समीर वानखेडे यांची गोव्यात मोठी कारवाई ; लाखो रुपयांच्या ड्रग्ज सह दोन आरोपींना अटक

Last Updated :Jan 3, 2022, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.