ETV Bharat / city

NCB SIT : सहा प्रकरणांचा तपास सुरू, एसआयटीने मुंबई एनसीबीकडून कागदपत्रे घेतली ताब्यात

author img

By

Published : Nov 6, 2021, 6:54 PM IST

Updated : Nov 6, 2021, 7:09 PM IST

file photo
फाईल फोटो

आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. यानंतर मुंबईतील 6 स्पेशल केसचा तपास स्थापन केलेली दिल्लीतील एनसीबीची एसआयटी टीम करणार आहे.

मुंबई - आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. यानंतर मुंबईतील 6 स्पेशल केसचा तपास स्थापन केलेली दिल्लीतील एनसीबीची एसआयटी टीम करणार आहे. संजय सिंग यांच्या नेतृत्वात ही एसआयटी तपास करणार आहे. आज दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर संजय सिंग यांनी एनसीबी कार्यालयात येऊन तब्बल दोन तास सर्व बाबींचा आढावा घेतला. तसेच सहा केस संदर्भात असलेले सर्व डॉक्युमेंट एसआयटीने आपल्या ताब्यात घेतले आहे.

संजय सिंग - SIT प्रमुख

हेही वाचा - प्रभाकर साईल यांच्या वकिलाची एनसीबी अधिकाऱ्यांशी भेट; बोलवल्यास साईल हजर राहणार असल्याचे सांगितले

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. 1996 च्या बॅचचे आईपीएस अधिकारी आणि एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांच्याकडे आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास हा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली एसआयटीची टीम आज (शनिवार) मुंबईत दाखल झाली आहे.

  • एसआयटीकडून प्रकरणाचा तपास सुरू - संजय सिंग

एनसीबीच्या एसआयटीकडून तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले असून, आजपासून तपास सुरू झाला असल्याची माहिती एसआयटी प्रमुख संजय सिंग यांनी दिली आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • साक्षीदारांचे पून्हा जबाब नोंदवण्याची शक्यता -

दिल्ली एसआयटी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पाहणी करणार आहे. तसेच कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर चौकशीला सुरुवात होणार आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणातील पुन्हा सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

  • या प्रकरणांचा एसआयटी करणात तपास -

आर्यन खान ड्रग प्रकरण, मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरण, तसेच नुकतेच ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अरमान कोहली प्रकरणाचा तपास ही एसआयटी करणार आहे. या व्यतिरिक्त अन्य तीन प्रकरणांचा तपास ही टीम करणार आहे.

हेही वाचा - दिल्ली SITची टीम मुंबईत दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास

Last Updated :Nov 6, 2021, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.