ETV Bharat / city

अरबी समुद्रात क्रूझवर हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; एनसीबीच्या धाडीत अमली पदार्थांसह 13 जण ताब्यात

मुंबईत क्रुजवर सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापा टाकला आहे. यात अनेक प्रकारचे ड्रग्ज, कोकेन, गांजा, एमडी आणि इतर अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. एनसीबी पथकाची पुढील कारवाई सुरू आहे.

समुद्रात क्रूझवर एनसीबीची कारवाई; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

author img

By

Published : Oct 2, 2021, 10:54 PM IST

Updated : Oct 3, 2021, 11:17 AM IST

मुंबई - मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका बॉलीवूड अभिनेत्याचा मुलाचाही समावेश असल्याचे समजते आहे. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.

अरबी समुद्रात क्रूझवर हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; एनसीबीच्या धाडीत अमली पदार्थांसह 13 जण ताब्यात

बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला पकडले

या कारवाईत एनसीबीने एकूण 13 जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिला दिल्लीच्या रहिवासी असून उच्चभ्रू व्यावसायिकांच्या मुली असल्याचे समजते आहे. तर ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे समजते आहे. यानंतर एनसीबीने पार्टीच्या आयोजकांनाही सकाळी साडेअकरा वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. सहा जणांनी या पार्टीचे आयोजन केल्याचे समजते आहे.

ड्रग्स विक्रेत्यालाही पकडले

क्रूझवर पार्टी सुरू असताना एनसीबीने धाड टाकली. या धाडीत पार्टीसाठी उपस्थित असलेल्या लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एका ड्रग्स विक्रेत्यालाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

प्रवासी बनून एनसीबीची कारवाई

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ते आपल्या पथकासोबत मुंबईतील त्या शिपवर प्रवासी बनून प्रवास करत होते. शिप समुद्राच्या मध्यावर पोहोचल्यानंतर शिपवर ड्रग्स पार्टी सुरू झाली. त्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन केले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर लागलीच एनसीबीच्या पथकाने कारवाई करत अनेकांना रंगेहाथ पकडले. सुमारे सात तास एनसीबीचे हे सीक्रेट ऑपरेशन चालले. एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनुन गेल्याने शिपमधल्या लोकांना या मोहीमेची चाहूलही लागली नाही.

ज्या शिपवर एनसीबीने कारवाई केली आहे, ती मुंबईची Cordelia Cruise आहे. एनसीबीचे शिपवरील ऑपरेशन सुमारे सात तास चालले. यापूर्वीही एनसीबीने अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत, परंतु असे सीक्रेट ऑपरेशन कधी पाहिले नसल्याची चर्चा आता होत आहे. या मोहीमेत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन आणि एमडी जप्त केले आहे. एनसीबीने पहिल्यांदाच शिपवरील ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केल्यामुळे ही मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या शिपचे ओपनिंग काही दिवसांपूर्वीच झाले होते. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स केला आहे.

वर्षभरात 300 कोटींचे ड्रग्स पकडले -
अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यरत झाला आहे. गेल्या वर्षभरात एनसीबीने 300 ड्रॅग विक्री करणाऱ्या लोकांना पकडले आहे. तसेच 300 कोटींचे ड्रग्स पकडल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

Last Updated : Oct 3, 2021, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.