ETV Bharat / city

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून प्रभाकर साईलची सात तास चौकशी; साईलचे वकील म्हणाले...

author img

By

Published : Nov 9, 2021, 12:30 AM IST

NCB interrogates Prabhakar Sail for seven hours; Sail's lawyer said ...
एनसीबीकडून प्रभाकर साईलची सात तास चौकशी; साईलचे वकील म्हणाले...

एनसीबीच्या एसआयटी टीमचे प्रमुख असलेले ज्ञानेश्वर सिंग यांनी प्रभाकर साईलचा जबाब सोमवारी नोंदवला. एनसीबीचे अधिकारी सुमारे सात तास प्रभाकर साईल याची चौकशी करत होते. प्रभाकर साईल आपल्या वकिलांच्या टीमसह चौकशीसाठी वांद्रे भागातील सीआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये दाखल झाला होता.

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रथम क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईल याने पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात एनसीबीने व्हिजिलन्स कमिटीने साईल यांना चौकशीला बोलावले होते. सोमवारी साईल चौकशी हजर झाल्यानंतर एनसीबीकडून साईलची सुमारे सात तास चौकशी करण्यात आली. यावेळी आमच्याकडे असलेले पुरावे हे आम्ही त्यांना दिलेले आहेत अशी माहिती प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिले आहे.

प्रभाकर साईलची 7 तास चौकशी -

एनसीबीच्या एसआयटी टीमचे प्रमुख असलेले ज्ञानेश्वर सिंग यांनी प्रभाकर साईलचा जबाब सोमवारी नोंदवला. एनसीबीचे अधिकारी सुमारे सात तास प्रभाकर साईल याची चौकशी करत होते. प्रभाकर साईल आपल्या वकिलांच्या टीमसह चौकशीसाठी वांद्रे भागातील सीआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये दाखल झाला होता.

साईलने केला होता आरोप -

यापूर्वी प्रभाकर साईलने एक व्हिडिओ प्रसारित करत समीर वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची दिल्लीच्या एनसीबी टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. प्रभाकरला काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो न आल्याने एनसीबीने मुंबई पोलिसांनाही पत्र लिहिले होते. सोमवारी प्रभाकर चौकशी हजर झाला होता, सुमारे सात तास त्याची चौकशी सुरू होती.

हेही वाचा - परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.