ETV Bharat / city

एनसीबी प्रकरण - नवाब मालिकांचा जावई समीर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

author img

By

Published : Jan 18, 2021, 4:04 PM IST

Updated : Jan 18, 2021, 4:37 PM IST

नवाब मलिक यांचा जावई समीर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली आहे. या प्रकरणात करण सजनानी व समीर खान यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅट मध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आल्याचे समोर आले होते.

nawabs-son-in-law-sameer-khan-remanded-in-judicial-custody-for-14-days
एनसीबी प्रकरण - नवाब मालिकांचा जावई समीर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई - बॉलीवूड ड्रग्स सिंडीकेट प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत समीर खान यांची रवानगी एनसीबी कोठडीत केल्यानंतर सोमवारी समीर खान यास न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

एनसीबी प्रकरण - नवाब मालिकांचा जावई समीर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

करण सजनानी व समीर खान यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅट मध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आलेली होती. याबरोबरच समीर खान याच्या बँक अकाउंट मधून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

मुच्छड पानवाला ही आहे शामिल -

काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा खार परिसरामध्ये छापेमारी करून ब्रिटिश अनिवासी भारतीय असलेल्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या करण सजनानी यास एनसीबी ने अटक केली होती. या बरोबरच अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या राहिला फर्निचरवाला सह आणखीन एका महिलेला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या झालेल्या चौकशीमध्ये मुंबईतल्या केम्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला उर्फ राम कुमार तिवारी या आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने 15 हजारांचा जामीन मंजूर केलेला आहे. दरम्यान करण सजनानी हा राम कुमार तिवारी याच्याकडे काही काही दिवसानंतर जाऊन एक पाकीट देत होता. राम कुमार तिवारी यांची बॉलीवुड इंडस्ट्री मधल्या सेलिब्रेटिं सोबत मोठी ओळख होती. त्यामुळे करण सजनानी कडे असलेले अमली पदार्थ सहजासहजी बॉलीवूड मधील सेलिब्रिटींना विकता यावे म्हणून रामकुमार तिवारीच्या मदतीने करन सजनानी अमली पदार्थाची तस्करी करत असावा असे समोर आले आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.