ETV Bharat / city

Nawab Malik On Lockdown : त्रिसुत्री पाळा अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागेल - नवाब मलिक

author img

By

Published : Dec 30, 2021, 3:35 PM IST

मुंबईत कोरोनाचा फैलाव ( Coronavirus Omicron variant ) वाढतो आहे. लोकांकडून नियमावलीचे पालन केले जात नाही. त्रिसूत्रीचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन पर्याय निवडावा लागेल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक ( Nawab Malik Speak About Lockdown ) यांनी आज दिले.

Nawab Malik On Lockdown
Nawab Malik On Lockdown

मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाचा फैलाव ( Coronavirus Omicron variant ) वाढतो आहे. लोकांकडून नियमावलीचे पालन केले जात नाही. त्रिसूत्रीचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन पर्याय निवडावा लागेल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक ( Nawab Malik On Lockdown ) यांनी आज दिले. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया

काय म्हणाले नवाब मलिक -

राज्यात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. काल राज्यात ३ हजार ९०० रुग्ण नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईत काल २ हजार ५१० रुग्ण आढळून आले. दुसरीकडे ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीवर मुंबई महापालिकेने कठोर निर्बंध लावले आहेत. मुंबईत आजपासून जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सोसायट्या सील केल्या जाणार आहेत. राज्य सरकारदेखील वाढत्या रुग्ण संख्येबाबत सतर्क झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहेत. लोकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. रुग्ण संख्या फोफावत आहे. नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन करावे. त्रिसुत्रीचे पालन न केल्यास लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकार घ्यावा लागेल, असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

मुंबई कलम 144 लागू -

ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू ( Section 144 Imposed in Mumbai ) करण्यात आले आहे. मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी असेल त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्येही लोकांना एकत्र जमता येणार नाही.

नवी नियमावली -

बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीला परवानगी आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी फक्त 25 टक्के उपस्थितीची परवानगी आहे. समुद्रकिनारी, बागेत आणि रस्त्यावर गर्दी करू नये, असंही आवाहन प्रशानसाकडून करण्यात आले आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडू नये. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि यासारख्या पर्यटन स्थळी गर्दी करू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अनेक जण नववर्षाचं स्वागत फटाके फोडून करतात. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी फटक्यांची आतिषबाजी करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Sanjay Raut in Nashik :'...म्हणूनच अजितदादा आणि बाकी आमदार संध्याकाळपर्यंत परत आले'; संजय राऊतांनी उलगडले रहस्य!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.