ETV Bharat / city

Nawab Malik : मलिकांनी 'ते' निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले

author img

By

Published : Oct 26, 2021, 4:52 PM IST

Updated : Oct 27, 2022, 5:35 PM IST

मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले
मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले

समीर वानखडे झोनल डायरेक्टर झाल्यानंतर एनसीबीने केलेल्या खोट्या कारवायांबाबत आपल्याकडे निवानी पत्र असून हे पत्र आपल्याला एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. आता हे पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे.

मुंबई : समीर वानखडे झोनल डायरेक्टर झाल्यानंतर एनसीबीने केलेल्या खोट्या कारवायांबाबत आपल्याकडे निवानी पत्र असून हे पत्र आपल्याला एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. आता हे पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे. ट्विटरवरून मलिकांनी याची माहिती दिली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे दररोज एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन एक-एक नवीन खुलासे करत आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी सादर केलेली काही कागदपत्रे खोटी असल्याचा दावा केला. तसेच समीर वानखडे हे मुंबईचे झोनल डायरेक्टर झाल्यानंतर एनसीबी विभागाकडून कशाप्रकारे खोट्या कारवाया करण्यात आल्या याबाबतचे एक निनावी पत्र आपल्याला एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

हे निनावी पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पाठविले आहे. या पत्रात एनसीबीने केलेल्या काही कारवाया खोट्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या खोट्या कारवायांमध्ये कशा प्रकारे निर्दोष लोकांना अडकवण्यात आलं होतं याबाबतचा खुलासा करण्यात आलेला आहे. मात्र या पत्रावर कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे नवाब मलिक यांनी पाठविलेल्या या निनावी पत्राची दखल एनसीबीकडून कशा घेतली जाईल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

निनावी पत्र कोणीही पाठवू शकतोनवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्याला एक निनावी पत्र दिल्याचा खुलासा केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांचा दावा खोडून काढला. निनावी पत्र हे कोणीही देऊ शकतो. या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही. अशा पत्रावर कसा काय विश्वास ठेवता येईल? असे प्रश्न क्रांती रेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केले आहेत. तसेच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांना एनसीबीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

कोणाचे आहे पत्र ?
एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात आलेले हे पत्र आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले असून हे पत्र एनसीबीने केलेल्या कारवाईसंदर्भात आहे. त्यामुळे हे पत्र आपल्याकडे पाठवत आहे, असे मलिक यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र आपल्याला एका निनावी व्यक्तीकडून आले असून संबंधित व्यक्ती एनसीबी कार्यालयाशी संबंधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे यातील मजकुरावरून वाटते, असेही मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पत्राची दखल घेऊन आपण एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईची योग्य ती दखल घेऊन आपण उचित कार्यवाही करावी, अशी विनंती मलिक यांनी एनसीबी महासंचालकांकडे केली आहे. नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्याचप्रमाणे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. यासंदर्भात त्यांनी एनसीबीचे महासंचालक यांच्याकडे पत्राद्वारे निपक्षपातीपणे चौकशीची मागणी केली आहे
Last Updated :Oct 27, 2022, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.