ETV Bharat / city

क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला व दोन मित्रांना सोडण्यासाठी फोन - नवाब मलिक

author img

By

Published : Oct 9, 2021, 3:11 PM IST

Updated : Oct 9, 2021, 4:40 PM IST

nawab malik on ncb
nawab malik on ncb

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित भारतीय यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे.

मुंबई - शनिवारी दोन तारखेला एनसीबीकडून कार्डीला क्रूजवर धाड टाकून 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या 11 जणांपैकी केवळ एनसीबीने 8 जणांनाच त्यानंतर ताब्यात घेतल्याचे सांगितले. मात्र ज्या तीन जणांना एनसीबीने सोडले त्यापैकी एक भारतीय युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय याचा मेहुणा रिषभ सचदेव हा होता. तर इतर दोघे प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला हे होते. या तिघांना सोडण्यासाठी त्या रात्री भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली तसेच महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी एनसीबी सोबत संपर्क साधून त्यांना बाहेर काढले, याबाबत आपल्याकडे व्हिडिओ असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला आहे. तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची एनसीबीने उत्तरे द्यावीत, अशी मागणीही केली आहे.

प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवालाने आर्यनला क्रूजवर नेले -
ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले ती सर्व उच्चवर्णीय लोकांची मुले आहेत. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. प्रतीक गाभा आणि आम्ही फर्निचरवाला यांनीच आर्यन खान याला क्रूज वरती येण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. हे सर्व एका प्लान नुसार करण्यात आले आणि त्यानंतर आर्यन आणि इतर लोकांना यामध्ये एनसीबीने अडकवले असल्याचा आरोप केला.

नवाब मलिक यांनी माध्यमांना दिलेला व्हिडिओ
सोडण्यात आलेल्यांचे फोन डिटेल्स तपासा -
रिषभ सचदेव, प्रतीक बाबा आणि फर्निचरवाला यांना सोडण्यासाठी त्या रात्री रिषभ सचदेव यांच्या वडिलांच्या फोनवरून भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांसोबत बोलणं झालं. रिषभ यांच्या वडिलांचा तसेच या तिघांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असं नवाब मलिक म्हणाले. या सर्व प्रकरणाचा तपास कोर्टामध्ये व्हाट्सअपच्या द्वारे सुरू असताना या लोकांचे फोन कॉल का तपासले जात नाहीत, असा सवालही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.


हे ही वाचा - ठाण्यात धावत्या एक्स्प्रेसमध्ये लुटमार करीत २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

एनसीबीच्या दोन पंचापैकी एक फरार -

या प्रकरणांमध्ये एनसीबीने ज्या दोघा जणांना पंच म्हणून दाखवलं आहे. त्यापैकी एक पंच के. पी. गोसावी यांना पुणे पोलीस शोधत आहेत. तसेच पंचनामा करत असताना तो पंचनामा चांगल्या लोकांकडून केला गेला पाहिजे. मात्र एनसीबीने दाखवलेले पंच के.पी. गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबद्दल लवकरच सत्य आपण समोर आणणार, आहोत असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

हे ही वाचा - सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

बॉलीवूड आणि मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न -

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान यांना टार्गेट करण्याचा प्लान गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यानुसार आर्यन खान याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. बॉलिवूड आणि मुंबईला बदनाम करण्यासाठी अशी प्रकरणे समोर आणली जात असल्याचा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Last Updated :Oct 9, 2021, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.