ETV Bharat / city

उच्चांक करण्यासाठी मागील 15 ते 20 दिवसांचे लसीकरण कमी केले; नवाब मलिक यांचा मोदी सरकारवर आरोप

author img

By

Published : Sep 18, 2021, 3:11 PM IST

Updated : Sep 18, 2021, 4:29 PM IST

पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशभरात जवळपास दोन कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण एकाच दिवशी करण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशभरात जवळपास दोन कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण एकाच दिवशी करण्यात आले. आतापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देण्याचा उच्चांक करण्यात आला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा - गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार

  • मागील 15 ते 20 दिवसांचे लसीकरण कमी केले - मलिक
    मंत्री नवाब मलिक

लसीकरण आज-उद्या आणि संपूर्ण महिनाभर का चालू शकत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. केवळ पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा उच्चांक करण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

  • कालसारखे दिवस रोज यावेत - राहुल गांधी
    rahul gandhi
    राहुल गांधी यांचे ट्विट

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. एकाच दिवशी दोन कोटींच्या वर लसीकरण होणारे दिवस नेहमीच यावेत, असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला लगावला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लसीकरणाचा उच्चांक केला असला तरी, केवळ एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा - 'ज्यांना पतंग उडवायची, त्यांनी उडवावी'! अखेर संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

Last Updated :Sep 18, 2021, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.