ETV Bharat / city

MP Navneet Rana : घरचे जेवण मिळावे यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा न्यायालयाकडे अर्ज

author img

By

Published : Apr 28, 2022, 3:38 PM IST

Updated : Apr 28, 2022, 7:46 PM IST

नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि रवी राणा यांनी घरचे अन्न मिळावे ( Navneet Rana application for home food ) यासाठी केला मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) अर्ज केला आहे. अर्जात राणा पती पत्नींने घरचे जेवण मिळावे अशी मागणी कोर्टाला विनंती केली आहे. उद्या सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकार राणा दाम्पत्याच्या अर्जावर उत्तर दाखल करणार आहे.

MP Navneet Rana
नवनीत राणा

मुंबई - नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि रवी राणा यांनी घरचे अन्न मिळावे ( Navneet Rana application for home food ) यासाठी केला मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) अर्ज केला आहे. अर्जात राणा पती पत्नींने घरचे जेवण मिळावे अशी मागणी कोर्टाला विनंती केली आहे. उद्या सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकार राणा दाम्पत्याच्या ( Rana Couple applied for home food ) अर्जावर उत्तर दाखल करणार आहे.

उद्या न्यायालयात सुनावणी - पोलिसांसोबत हुज्जत घातल्या प्रकरणात एफआयआर रद्द करावा यासाठी दाखल केलेली याचिका राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळल्यानंतर राणा दाम्पत्यांने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र राणा दाम्पत्यांला सेशन कोर्टातही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान त्यांनी घरचे जेवण मिळण्याकरिता केलेल्या अर्जावर देखील उद्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत नवनीत राणा हनुमान चालीसा पठण प्रकरणात झालेल्या घडामोडी -

राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत - हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईत जोरदार खडाजंगी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा लक्षात घेत राणा दाम्पत्याने माघार घेतली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवनीत राणा यांचे ओम बिर्लांना पत्र - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले आह. या पत्रात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले होते. पण, ते दिले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिले नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,' असा दावा नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.

लोकसभा सचिवालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवल्यानंतर केंद्र अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लोकसभेने राज्यातील महाआघाडी सरकारला २४ तासात या प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राणा यांनी याबाबतचा ईमेल ओम बिर्ला यांना पाठवला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांचा वेळ दिला आहे. याचबरोबर लोकसभेच्या हक्कभंग समितीने नवनीत राणा यांना बेकायदा अटक केल्याप्रकरणी २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया - नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नवनीत राणा ( Dilip Walse Patil on Navneet rana jail treatment ) यांनी केलेल्या आरोपांमध्ये वस्तुस्थिती असल्याचे वाटत नाही, असे ते म्हणाले. याबाबतची परिपूर्ण माहिती लोकसभा अध्यक्षांना लवकरात लवकर दिली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ जारी - नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केला आहे. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचे या व्हिड़िओत दिसत आहे.

व्हिडिओचा अन् नवनीत राणांच्या तक्रारीचा संबंध नाही - पोलीस आयुक्त संजय पांडेंनी जारी केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ हा खार पोलीस ठाण्यातील आहे. त्यानंतर राणांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. त्यामुळे या व्हिडिओचा आणि नवनीत राणांनी केलेल्या तक्रारीचा काहीही संबंध नसल्याचा दावा नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चेंट यांनी केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray's Rally In Mumbai: मुंबईत धडाडणार शिवसेनेची तोफ ; उद्धव ठाकरे यांची १४ मेला होणार जाहीर सभा

Last Updated :Apr 28, 2022, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.