ETV Bharat / city

Maharashtra Assembly Speaker Election : याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार- नाना पटोले

author img

By

Published : Mar 15, 2022, 5:46 PM IST

नाना पटोले
नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून ( Maharashtra Assembly Speaker Election ) भाजप सर्वोच्च न्यायालयात गेले ( BJP In Supreme Court ) आहे. त्याचा निकाल येत्या दोन - तीन दिवसात लागेल. त्यानंतर याच अधिवेशनात ( Maharashtra Budget Session ) विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी दिली.

मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Budget Session ) सुरू होऊन तिसरा आठवडा सुरू झाला तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक ( Maharashtra Assembly Speaker Election ) अजून झालेली नाही. या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार गंभीर असून, राज्यपाल त्यास दुजोरा देत नाहीत. या कारणास्तव नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

अध्यक्षाशिवाय कामकाज चालू शकत नाही

विधिमंडळाचे कामकाज विधानसभा अध्यक्ष यांच्या शिवाय चालू शकत नाही. काल आम्ही स्वतः सर्व आमदार बसून चर्चा केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली. अगोदर सुप्रीम कोर्टात ( BJP In Supreme Court ) काय होते हे पहिले जाईल आणि मग राज्यपालांची भेट मागितली जाईल. पण या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांची निवडणूक होणार. मी राज्यात सर्व ठिकाणी फिरतो आहे. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. जी काही सबसिडी आहे ती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. 2014 पासून फडणवीस सरकारने शेतकऱ्याला फसवलं आहे. राज्य काळोखात जाईल अशी परिस्थिती आली. आपल्याच मंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बोलावं लागलं. सगळ्यांना न्याय मिळावा ही भूमिका काँग्रेसची आहे. शेतकऱ्यांची कापलेली वीज लाईन जोडायचं काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांवर अत्याचार होऊ नये हीच आमची इच्छा आहे, असेही पटोले म्हणाले.

सिनेमा बघून जर प्रश्न सुटत असतील तर भाजपने सिनेमे बघत बसावेत

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सर्वांनी बघावा, असं मोदी म्हणाले. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदींना आज सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? चित्रपटाचा कोणी विरोध केलेला नाही. मला याबाबत काही बोलायचे नाही. नरेंद्र मोदी संघ परिवाराचे आहेत. एकीकडे टीका करायची आणि संघ चालवायचा असा प्रयत्न मोदी करत आहेत. शेतकरी आंदोलन करत असतांना मोदींचे लक्ष नव्हते. मोदींना सिनेमा बघायला वेळ आहे. मोदी यांनी सिनेमा बघत राहावे पंतप्रधान पद सोडावे. ज्या घोषणा निवडून येण्यासाठी त्यांनी केल्या त्यासाठी सिनेमाचा विषय काढला. निवडणुका झाल्यावर लगेच महागाई वाढली. मोदी स्वतः संघ परिवारातून आहेत. एकीकडे टीका करायची आणि दुसरी कडे संघ परिवार प्रथा पसरवायची. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. असे सांगत या विषयाचा गांभीर्याने विचार करावा लागेल असेही नाना पटोले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.