ETV Bharat / city

सरकारमध्ये काय बदल होतील ते 10 मार्च नंतर दिसेल! पटोलेंचा पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात खळबळ

author img

By

Published : Feb 16, 2022, 4:40 PM IST

Updated : Feb 16, 2022, 5:27 PM IST

दहा मार्च नंतर सरकारमध्ये काय बदल होतील ते दिसतीलचं असे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले ( Nana Patole on changes in maharashtra government ) यांनी हे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ केली आहे.

nana patole on changes in maharashtra government
सरकारमध्ये बदल नाना पटोले

मुंबई - दहा मार्च नंतर सरकारमध्ये काय बदल होतील ते दिसतीलचं असे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. मुंबईत आज काँग्रेसच्या दादर येथील प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on changes in maharashtra government ) यांनी हे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ केली आहे.

हेही वाचा - Shiv Sena Press : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट आणि निल सोमैयांना अटक करा; संजय राऊत कडाडले

दहा मार्च नंतर नेमके राज्य सरकारमध्ये काय बदल होणार? किंवा काँग्रेसकडे असलेल्या मंत्रिपदांपैकी किती चेहरे बदलणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काल 15 फेब्रुवारी रोजी गोंदियामध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नाना पटोले यांनी 10 मार्च नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होतील, असे वक्तव्य केले होते.

सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जातोय

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. हा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ, असे नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले. किरीट सोमैया यांनी आतापर्यंत लावलेल्या आरोपानंतर एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही, असे नाना पटोले यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच, केंद्र सरकारने आता डिफेन्सची 75 हजार एकर जमीनही विकायला काढली आहे. त्यांना देशाच्या सुरक्षेबाबत काय देणे घेणे, असा टोलाही नाना पटोले यांनी यावेळी केंद्र सरकारला लगावला.

काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार 10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल होणार

काँग्रेस हायकमांडने दिलेल्या निर्देशानुसार, दहा मार्चनंतर महविकास आघाडी सरकारमध्ये बदल केले जाणार असल्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहेत. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेसचा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले. दहा मार्च नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होतील, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांच्या वक्तव्यालाही दुजोरा मिळाला आहे.

संजय राऊत यांनी केलेले आरोप योग्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केलेले आरोप योग्य असल्याचे मत यावेळी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. तसेच, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत लवकरात लवकर चौकशी व्हावी याबाबतचे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत आहे त्याचप्रमाणे राज्याने आपल्याकडे असलेल्या तपास यंत्रणेचा वापर करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा तपास करावा, असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. या सोबतच आरोप करताना प्रत्येकाने स्वतःचे घर हे काचेचे आहे, हे लक्षात ठेवावे, असा टोलाही भारतीय जनता पक्षाला लगावला.

हेही वाचा - Kurla Carshade Scam : कुर्ला कारशेड येथील 8 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल; गैर पद्धतीने निविदा दिल्याचा आरोप

Last Updated :Feb 16, 2022, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.