ETV Bharat / city

Hijab controversy : आमच्यासाठी हिजाबपेक्षा देशातील युवकांचा रोजगार महत्त्वाचा; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

author img

By

Published : Feb 13, 2022, 2:21 AM IST

nana Patole hijab
nana Patole hijab

देशात सद्या हिजाबवरून ( Hijab controversy ) मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. अशात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole Statement on Hijab ) यांनीही भुमिका स्पष्ट केली आहे. हिजाब आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी रोजगाराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले ( Nana Patole ) यांनी दिली आहे.

मुंबई - देशात सद्या हिजाबवरून ( Hijab controversy ) मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. अशात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole Statement on Hijab ) यांनीही भुमिका स्पष्ट केली आहे. हिजाब आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी रोजगाराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले ( Nana Patole ) यांनी दिली आहे.

काय म्हणाले नाना पटोले -

देशात सध्या हिजाबचा मुद्यावरूर राजकारण होत आहे. मात्र, हिजाब आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी युवकांच्या रोजगाराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. तरुणांना रोजगार देणे, हे सरकारचे काम आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने हिंदू-मुस्लिम वाद पेटवला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

काय आहे हिजाब वाद?

कर्नाटकच्या उडुपी आणि चिकमंगळुर शहरातील महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये घडली होती. त्यानंतर 5 शैक्षणिक संस्थानी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली. तर यावर कर्नाटक शिक्षण कायदाचा दाखला देत सरकारने म्हटले, की सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचे कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटले. यानंतर वाद चिघगळला उडुपीमधल्या खासगी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि वादावादी झाली. दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर संबंधित महाविद्यालय उच्च न्यायालयाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत बंद करण्यात आले. शिवाय कर्नाटकच्या इतरही जिल्ह्यामध्ये यावरुन दगडफेकी सारख्या घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार दोन शाळा आणि महाविद्यालय बंदच ठेवले.

हेही वाचा - Muskan Khan Name For Urdu House : मालेगावच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देणार; महापौर ताहेरा शेख यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.